शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

धनगर समाजाचा मोर्चा

By admin | Updated: July 31, 2014 01:23 IST

हिंगोली : अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.

हिंगोली : अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.अहिल्यादेवी होळकर चौकातून या मोर्चाला प्रारंभ झाला. जि.प.शाळा, खुराणा पेट्रोलपंप, गांधी चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हाती पिवळे झेंडे घेऊन नागरिक मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले होते. जवळपास चार ते पाच हजारांपर्यंत संख्या होती. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाकडे समाजाच्या भावना कळविण्याची विनंती केली. राज्यघटनेत ४६ व्या कलमानुसार महाराष्ट्रात एस.टी. प्रवर्गाच्या यादीत क्र.३६ वर धनगड ही जात आहे. मात्र धनगड व धनगर ही जात वेगळी असल्याचे कारण दाखवून आजपर्यंत आरक्षण नाकारण्यात आले आहे. त्यामुळे अन्याय होत असून पहिल्या मागासवर्ग आयोगानेच अनुसूचित जमातीच्या अंमलबजाणीची शिफारस केली होती, असे निवेदनात म्हटले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मांडून प्रचंड घोषणाबाजी केली. आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या घोषणांचा यात समावेश होता.निवेदन दिल्यानंतर मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व अ‍ॅड. माधवराव नाईक, रमेश नाईक, अशोकराव नाईक, केशवराव नाईक, अ‍ॅड.बाबा नाईक, शिवाजीराव मस्के, विनोद नाईक, पंढरी ढाले, दिनकर कोकरे, शशिकांत वडकुते आदींनी केले. मोर्चासाठी अ‍ॅड.राम नप्ते, डॉ.रमेश मस्के, विजय नाईक, भास्कर पोले, प्रा. गजानन गडदे, थोरात, सुभाष नाईक, डॉ.विलास खरात, रवी गडदे, शिवाजी मस्के, विकास शिंदे, अशोक करे, शिवाजी हाके, प्रल्हाद जहाने, बालासाहेब बारहाते, बाळासाहेब वायकोळे, विश्वनाथ गवारे, लखन शिंदे, प्रदीप नाईक, विनोद नाईक बालाजी डुकरे, श्याम हिंबरे आदींनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)एकजुटीचे घडविले दर्शन पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून एकत्रितरीत्या या समाजाने आपल्या आरक्षणाची मागणी लावून धरल्याचे दिसून आलेपिवळ्या झेंड्यांमुळे मोर्चेकऱ्यांकडे लक्ष वेधल्या जात होते. त्याचबरोबर काहींनी फलकेही आणली होती.