लातूर : ७ व ८ जानेवारी २०१७ रोजी पहिले राज्यस्तरीय धनगर आदिवासी साहित्य संमेलन सोलापूर येथे हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनात विविध सांस्कृतिक उपक्रम, परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, संयोजन समितीच्या वतीने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक संजय सोनवणी यांची तर स्वागताध्यक्ष जयसिंगराव शेंडगे यांची निवड करण्यात आली आहे. शनिवार, ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून, ८ जानेवारी रोजी समारोप होणार आहे. परिषदेस माग़ो़ मांडुरके, संभाजीराव सूळ, अॅड़ मंचकराव डोणे, डॉ़़ अभिमन्यू टकले, श्रीरंग शेवाळे, राजपाल भंडे उपस्थित होते़
धनगर आदिवासी साहित्य संमेलन
By admin | Updated: December 31, 2016 23:37 IST