शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धम्म संस्कार बुद्ध नियमानेच करा; त्यासाठी प्रशिक्षण हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:47 IST

धम्म संस्कार बुद्ध नियमानेच व्हावेत. अगदी साधा आणि सरळ धम्म संस्कार असताना नको ते अनुकरणाचा प्रयत्न टाळण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे, असे प्रतिपादन भदंत विमलकित्ती गुणसिरी यांनी केले. 

औरंगाबाद : धम्म संस्कार बुद्ध नियमानेच व्हावेत. अगदी साधा आणि सरळ धम्म संस्कार असताना नको ते अनुकरणाचा प्रयत्न टाळण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे, असे प्रतिपादन भदंत विमलकित्ती गुणसिरी यांनी केले. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे डॉ. अशोक गायकवाड यांच्या हस्ते धम्म शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी भदंत आनंद होते. यावेळी भदंत विमलकित्ती गुणसिरी म्हणाले, कोणत्या संस्काराला कोणता विधी, तसेच पाली भाषेचे उच्चारण कसे करावे, बुद्ध धम्माची शिकवण याविषयी काहीही माहिती नसताना सध्या कोणीही अप्रशिक्षित व्यक्ती अपूर्ण गाथा घेतात. ७० वर्षांनंतरही आपणास अभ्यासपूर्ण धम्म संस्कार देता येत नाही. आपल्यातील संवाद व समन्वयाअभावी बुद्ध, फुले, आंबेडकर चळवळीला पदोपदी गतिरोधकाला सामोरे जावे लागत आहे. भारत बौद्धमय करण्याचे मिशन गतिमान करण्यासाठी प्राज्ञजन परिषदेने धम्म प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.

 शहरातील बौद्ध उपासक, समता सैनिक दलाचे पदाधिकारीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन सत्रात शिबीर घेण्यात आले. पहिल्या सत्रात ‘धम्मदीक्षा आणि नामांतर अनिवार्य’या विषयावर व्याख्यान व नंतर प्रश्नोत्तरात उपासकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी पी. आर. कांबळे, संघराज धम्मकित्ती,व्ही. एम. परधने, अ‍ॅड. हर्षवर्धन प्रधान, प्रकाश ससाने आदींसह संयोजकांनी परिश्रम घेतले. संघराज धम्मकित्ती यांनी सूत्रसंचालन केले. विलास सिरसाट यांनी आभार मानले. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकSocialसामाजिक