शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत धमाल; अनेक गावच्या सरपंच पदावर तीन पक्षांनी ठोकली दावेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 16:55 IST

निकाल लागताच आमच्याच पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा, कॉंग्रेस, शिवसेनेला केला.

ठळक मुद्देगावगाड्याचा आकडा वाढविण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ

फुलंब्री तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतीमध्ये हेच चित्र दिसून येत आहे

फुलंब्री : तालुक्यातील सरपंच पदाची संख्या वाढविण्यासाठी आणि सर्वाधिक गावातील सत्ता आपल्याच पक्षाच्या हाती मिळावी म्हणून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. धामणगावच्या सरपंचपदावर तर चक्क शिवसेना, भाजपा व कॉंग्रेसच्यावतीने दावा करण्यात आला. मुळात धामणगावच्या सरपंचांना व सदस्यांना राजकीय पक्षाच्या या केविलवाणी दाव्याची माहितीदेखील नाही. त्यामुळे धामणगावावर नेमकी सत्ता तरी कोणाची, हा प्रश्न निरुत्तरच आहे.

तालुक्यात नुकत्याच ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात चार ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. तर ४९ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. निकाल लागताच आमच्याच पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा, कॉंग्रेस, शिवसेनेला केला. या सर्वांची गोळाबेरीज लावली असता तालुक्यात असलेल्या सदस्य संख्येपेक्षा जास्तीचा आकडा होऊ लागला आहे. दरम्यान सरपंचपदाच्या निवडणुका झाल्या. आता या सरपंच पदावरही तिन्ही पक्षांच्यावतीने वेगवेगळे दावे केले जात आहेत. असे असले तरी जनतेला सत्य काय आहे, याची जाणीव तर आहेच. धामणगाव येथील सरपंचपदी सरसाबाई डिडोरे यांची निवड झाली. त्या आमच्याच पक्षाच्या सरपंच आहेत, असा दावा भाजप व शिवसेनेकडून पत्रकाद्वारे केला आहे, तर कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तोंडी दावा केला आहे. वास्तविक अनेक गावात पॅनल तयार करताना विविध पक्षाशी निगडित उमेदवार घेतले गेले आहे. गावातील राजकारण वेगळे असते. सरपंचपद देताना काही ठिकाणी अडीच वर्षांची तडजोड करण्यात आली आहे. गावगाड्याच्या राजकारणात बहुतांश ठिकाणी पक्षाचा फारसा विचार केला गेला नाही. अशा परिस्थितीतदेखील राजकीय पक्षांची दावेदारी केविलवाणीच म्हणावी लागेल.

या गावांवर केला विविध पक्षांनी दावातालुक्यातील सुलतानवाडी, धामणगाव, सोनारी, दरेगाव दरी, सांजूळ या पाच ग्रामपंचायतमध्ये आमचाच सरपंच असल्याचा दावा शिवसेना व भाजपाच्यावतीने करण्यात आला. दोन्ही पक्षांच्या तालुका अध्यक्षांनी पक्षाच्या लेटरहेडवर अशा प्रकरचे परिपत्रक काढून या गावाचा सरपंच आमच्या पक्षाचा असल्याचे जाहीर करून टाकले. यासंदर्भात त्यांनी प्रत्यक्षात सरपंच, उपसरपंच यांच्यासोबत चर्चादेखील केली नाही. केवळ गावगाड्याची संख्या वाढविण्यासाठी असे फंडे वापरले जाऊ लागले आहेत. शिवाय महाल किन्होळा, साताळ पिंप्री, वाणेगाव, वाकोद दरेगाव दरी, कान्हेगाव, अडगाव खुर्द येथील उपसरपंच पदावर ही भाजप व शिवसेनेच्यावतीने दावेदारी ठोकली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच