शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नाथषष्ठीसाठी पैठणमध्ये येणाऱ्या भाविकांची होणार कोरोना तपासणी; नगरपरिषदेने उभारली तीन केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 19:36 IST

नगर परिषदेच्यावतीने नाथमंदीर व यात्रा मैदान परिसर उद्यापासून सँनिटायिझ करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

ठळक मुद्देतीन कोरोना तपासणी केंद्र नगरपरिषदेच्यावतीने आज उभारण्यात आले आहेत

पैठण : नाथषष्ठी निमित्ताने  भाविक व वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता पैठण शहरात येणाऱ्या रस्त्यावर चेकपोस्ट व कोरोना तपासणी केंद्र प्रशासनाच्यावतीने उभारण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांची या ठिकाणी तपासणी करण्यात येणार असून लक्षणे असल्यास अँटिजेन चाचणी करण्यात येईल असे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पैठण शहरात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासन सतर्क झाले असल्याचे दिसून येत आहे.पैठण शहरात येणाऱ्या  पैठण-शेवगाव रोडवर गोलनाका परिसर, पैठण-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल सह्याद्रीजवळ व शहरातील गागाभट्ट चौकात असे तीन कोरोना तपासणी केंद्र नगर परिषदेच्यावतीने आज उभारण्यात आले. या ठिकाणी पैठण शहरात येणाऱ्या भाविकांची व वारकऱ्यांची थर्मल गनद्वारे तापमान तपासून शरीरातील ऑक्सिजन लेव्हल सुध्दा घेण्यात येणार आहे. यात लक्षणे आढळून आलेल्या भाविकांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. नगर परिषदेच्यावतीने नाथमंदीर व यात्रा मैदान परिसर उद्यापासून सँनिटायिझ करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले. दरम्यान आज नाथमंदीर परिसर, गोदाकाठातील निर्याण दिंडी मार्ग, गागाभट्ट परिसर, पालखी ओटा, व आतील नाथ मंदीर परिसराची स्वच्छता नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आली.

पोलिसांचे पथसंचलन.....आज उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावाड, व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या उपस्थितीत आज पोलीस दलाचे शहरातून संचलन करण्यात आले.

तगडा पोलीस बंदोबस्त.....नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी भाविक व वारकरी दर्शनासाठी येणार हे गृहीत धरून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले. २० वरीष्ठ पोलीस अधिकारी, आरसीपी पथक, व जवळपास ३०० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त विविध ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे. 

दोन चेक पोस्ट...पैठण व अहमदनगर जिल्हा हद्दीवर बलदवा फार्म हाऊसजवळ व पैठण औरंगाबाद रस्त्यावर सह्याद्री चौकात असे दोन ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.

वारकरी भाविकांचे आजपासून आगमन.....नाथषष्ठी साठी मोठ्या संख्येने वारकरी असलेल्या दिंड्या पैठण शहरात येतात मात्र आज चार ते पाच वारकरी मिळून दिंडी घेऊन येत असल्याचे दिसून आले. दरम्यान गुरुवारी सायंकाळपासून थोड्याफार प्रमाणात वारकऱ्यांचे आगमन पैठण शहराछ सुरू झाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद