शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

त्रिवार जयजयकार! श्रीलंकेतून आलेल्या श्रीराम, सीताच्या पादुकांसमोर भाविक नतमस्तक

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 29, 2023 12:38 IST

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून श्रीलंका ते अयोध्या अशी ‘रामराज्य युवा यात्रा’ १५ डिसेंबरला काढण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : ‘त्रिवार जयजयकार रामा, त्रिावर जयजयकार, तुला चिंतिते सुदीर्घ आयु... पुलकित पृथ्वी, पुलकित वायू, आज जाहले छत्रपती संभाजीनगर उद्धार’.... जेव्हा रावणाचा वध करून, विजयी होऊन श्रीराम सीताला सन्मानपूवर्क पुष्पक यानातून आणतात. तेव्हा अयोध्येत जो आनंदोत्सव होतो, त्याचे वर्णन ‘गीतरामायणा’मधील गाण्यात केले आहे. त्याच गाण्याची आज सर्वांना आठवण झाली... जेव्हा श्रीलंकेतून प्रभू श्रीराम व सीता यांच्या पादुका शहरात आणल्या तेव्हा सर्व भाविक नतमस्तक झाले.

प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून श्रीलंका ते अयोध्या अशी ‘रामराज्य युवा यात्रा’ १५ डिसेंबरला काढण्यात आली. श्रीलंकेतील अशोक वाटीकेतून यात्रेला सुरुवात झाली. आणि श्रीराम वनवास काळात जिथे जिथे गेले त्या भागातून ही यात्रा जाणार आहे. गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजता क्रांती चौकात पोहोचली. तेव्हा सर्वांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ असा गगनभेदी जयघोष केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सर्वांचे स्वागत केले. सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने ही यात्रा निघाली.

सजविलेल्या रथात समोरील बाजूस प्रभू श्रीरामाच्या पादुका, तर पाठीमागील सजविलेल्या रथात ‘सीता माते’च्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. इतर रथांमध्ये साधू-संत विराजमान होते. भगवा ध्वज हातात घेऊन युवक, महिला ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयजयकार करीत होते. ढोल पथकाच्या दणदणाटात यात्रा पुढे सरकरत होती. यात्रा मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. रस्त्याच्या आजूबाजूला शेकडो भाविक उभे होते. जसे श्रीरामाची पादुका असलेले रथ जवळ येत तेव्हा इमारतींवरून पुष्पवृष्टी केली जात होती. सर्व जण आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात पादुकांचे फोटो काढत होते. नूतन कॉलनी, पैठण गेट, टिळकपथ मार्गे रात्री ७:३५ वाजता गुलमंडीवर यात्रा पोहोचली. यावेळी व्यासपीठावर यात्रेचे मार्गदर्शक डॉ. राम अवतार शर्मा महाराज, भारतानंद सरस्वती महाराज, गणेश रामदासी महाराज यांच्यासह आ. प्रदीप जैस्वाल, विहिंपचे देवगिरी प्रांताध्यक्ष संजय बारगजे, हर्षवर्धन कराड, महावीर पाटणीसह समितीचे सर्व पदाधिकारी हजर होते.

२ हजार लोकांना अयोध्येत नेणारअयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर तिथून प्रत्येक जिल्ह्याला तारीख देणार आहेत. आपल्या जिल्ह्याला आमंत्रण देण्यात येईल तेव्हा येथून २ हजार भाविकांना अयोध्येत नेण्यात येणार आहे. तसेच, ५ लाख हनुमान चालिसा घरोघरी वाटण्यात येणार आहेत.- डॉ. भागवत कराड,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

मंदिर संरक्षणाची जबाबदारी सर्वांचीअयोध्येत श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मात्र, आता या मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. यासाठी प्रत्येक राम भक्ताला सज्ज व्हावे लागणार आहे.- डॉ. राम अवतार शर्मा,यात्रा मार्गदर्शक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक