शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

राळेगण सिद्धी, हिवरेबाजारच्या धर्तीवर देवगावची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:50 IST

हिवरेबाजार, राळेगणसिद्धीच्या धर्तीवर आता वडवणी तालुक्यातील देवगावची वाटचाल सुरू आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड/वडवणी : हिवरेबाजार, राळेगणसिद्धीच्या धर्तीवर आता वडवणी तालुक्यातील देवगावची वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यात आदर्श गाव असणाºया देवगावच्या १०५ महिलांनी तीन दिवस विविध ठिकाणी भेट देऊन गावच्या विकासासाठी अभ्यास केला आहे. चुल आणि मुल या चौकटीत अडकेल्या महिला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्या आहेत. कोणी न ओळखणाºया देवगावची ओळख महिला कारभारणींनी राज्याच्या कानाकोपºयात नेऊन पोहोचवली आहे.वडवणी तालुक्यातील परंतु माजलगावमध्ये आर्थिक व्यवहार करणाºया देवगावची लोकसंख्या १३०० आहे. २५२ उंबरठ्याच्या गावात सध्या विविध आदर्श उपक्रम हाती घेतले जात आहेत. एरव्ही चुल आणि मुल व संसारात अडकून पडलेल्या महिलांना येथील सरपंच कैवल्याबाई रघुनाथ सुरवसे व उपसरपंच राधा जनार्दन सुरवसे यांनी त्यांना चौकटीतून बाहेर काढत विविध आदर्श गावांच्या अभ्यास दौºयासाठी नेले. तीन दिवस चाललेल्या या दौºयात महिलांनी आदर्श गावांचा अभ्यास करून तो ‘पॅटर्न’ गावात राबविण्याचा संकल्प केला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.दरम्यान, आदर्श गाव असलेल्या हिवरेबाजार येथे महिलांनी प्रथम भेट दिली. येथे पूर्ण गावांची पाहणी केली. ग्रामपंचायतचा कारभार कसा चालतो, डोंगरावरील पाणलोटची कामांची पाहणी करून अभ्यास केला. पोपटराव पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीला भेट दिली. येथेही महिलांनी पूर्ण गाव फिरून हजारे यांच्याशी चर्चा केली त्यांनी महिलांच्या धाडसाचे आणि गावात केलेल्या कामांचे कौतूक केले. त्यांना गाव आदर्श बनविण्यासाठी काही टिप्सही दिल्या.