शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी करावी', देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 15:32 IST

'आम्हाला आमची जमीन माहित आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत.'

औरंगाबाद: सीमाप्रश्नासह विविध मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राज्यातील शिंदे सरकारवर खोचक टीका केली. यावेळी पवारांनी सरकारला पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्लाही दिला. पवारांच्या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

शरद पवारांना प्रत्युत्तरआज देवेंद्र फडणवीसऔरंगाबाद शहरातील ऑरिक सिटीमध्ये भरवण्यात आलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आले आहेत. दरम्यान, विमानतळावर माध्यमांनी त्यांना शरद पवारांच्या टीकेबाबात विचारणा केली. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'आम्हाला आमची जमीन माहित आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला वाटतं की नेमकं हवेत कोण आहे, याची तपासणी त्यांनी केली पाहिजे', असे प्रत्युत्तर फडणवीसांनी शरद पवारांना दिलं.

सीमाप्रश्नी सरकार गंभीर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरही भाष्य केलं. सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर फडणवीस म्हणाले, 'सीमाप्रश्नी सरकार खूप गंभीर आहे. आम्ही हरीश साळवेंशी संपर्क साधला आहे, ते आपली केस मांडतील अशी मला आशा आहे. त्यामुळे आपली केस मजबूत आहे', असं फडणवीस म्हणाले.

सामना पेपर नाहीदरम्यान, फडणवीसांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनावरही खोचक टीका केली. सामनामधील संजय राऊतांच्या रोखठोक या सदरामध्ये त्यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता त्यावर उत्तर देण्यास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला. 'सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही', असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला.

काय म्हणले होते शरद पवार?'सत्ता हातात आल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं. पण की सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांची वेगवेगळी विधानं असतात. यांना तुरुंगात घालीन, त्यांचा जामीन रद्द करीन.. ही काही राजकीय नेत्यांची कामं नाहीत. पण, इतकी टोकाची भूमिका काही राजकीय नेत्यांनी घेतली,' असं शरद पवार म्हणाले होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारAurangabadऔरंगाबाद