शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अडथळ्यांची शर्यत संपली; छत्रपती संभाजीनगरचा विकास आराखडा ३३ वर्षांनंतर प्रसिद्ध

By मुजीब देवणीकर | Updated: March 7, 2024 12:43 IST

१९९१ नंतर आला दुसरा विकास आराखडा

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ३३ वर्षांपासून रखडलेला शहर विकास आराखडा शासन नियुक्त विशेष अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी बुधवारी रात्री अचानक महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांना सादर केला. गुरुवारी हा आराखडा नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात येईल. शहर विकासाचा हा रोडमॅप मागील आठ वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत अडकला होता.

जुने शहर आणि दुसरा शहराची वाढीव हद्द अशा दोन विकास आराखड्याचा वापर सध्या महापालिकेत होतो. याशिवाय सिडको, एमआयडीसीने नियोजन प्राधिकरण म्हणून स्वतंत्र विकास आराखडे तयार केले आहेत. २००१ मध्ये शहराच्या वाढीव हद्दीनंतर कोणताही आराखडा तयार झाला नाही. २०१५-१६ मध्ये शासनाने विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. लोकप्रतिनिधींनी आराखड्याच्या नियमांचे पालन न केल्याने यासंदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी शासनाने शहराचा जुना आणि नवीन विकास आराखडा एकत्रित तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार नगररचना अधिकारी रजा खान यांच्या नेतृत्वाखाली विशेष डीपी युनिटची स्थापना केली. त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करून प्रशासकांना सादर कला होता. प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम या युनिट मार्फत सुरू असताना शासनाने विशेष अधिकारी म्हणून श्रीकांत देशमुख यांची नियुक्ती केली. अजूनही सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात खटला सुरू आहे.

देशमुख यांनी प्रारूप विकास आराखडा तयार केला. त्यांनी बुधवारी रात्री प्रारूप विकास आराखड्याच्या प्रती महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांना सुपूर्द केल्या. यावेळी शहर अभियंता ए. बी. देशमुख, उपसंचालक नगररचना मनोज गर्जे, उपायुक्त सोमनाथ जाधव, नंदा गायकवाड, कार्यकारी अभियंता के. एम. फालक, डीपी युनिटची टीम व इतर अधिकारी उपस्थित होते.

शहराला मिळेल नवीन दिशाविकास आराखडा स्वीकारल्यानंतर प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, एवढे वर्षे शहराचा विकास आराखडा रखडणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या विलंबामुळे शहराचा विकास दिशाहीन झाला होता. आराखड्याचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला, ही बाबसुद्धा शहरासाठी दुर्दैवी आहे. प्रारूप विकास आराखड्यामुळे शहराला नवीन दिशा मिळेल. कोणताही विकास आराखडा सर्वांना खूश करणारा नसतो.

सूचना, हरकती मागविणारशासन नियुक्त अधिकारी व त्यांच्या टीमने सीलबंद लिफाफ्यात आराखडा आणि अहवाल दाेन प्रतीत सादर केला. मनपा मुख्यालयात हा आराखडा प्रसिद्ध करण्यात येईल. नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात येणार आहेत.

अशी बसली होती विकासाला खीळशहराचा विकास आराखडा तयार होत नसल्याने अनेक मोठे गृहप्रकल्प रखडले होते. ८ वर्षांपासून आरक्षणे, रस्ते, रुंदीकरणाला ब्रेक लागला होता. शहराच्या चारही बाजूने नियोजन नसलेल्या वसाहतींचे जाळे वाढू लागले. सार्वजनिक वापरासाठी कुठेही जागा मिळत नव्हत्या. नवीन विकास आराखड्यात अनेक समस्या मार्गी लागणार हे निश्चित.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका