शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

शहर विका; मात्र आमच्या साक्षीने

By admin | Updated: May 21, 2014 01:11 IST

औरंगाबाद : महापालिकेने ‘शहर विकावे; मात्र आमच्या साक्षीने’ असे अफलातून वक्तव्य करून सत्ताधार्‍यांनी सर्वसाधारण सभेत धमाल उडवून दिली.

औरंगाबाद : महापालिकेने ‘शहर विकावे; मात्र आमच्या साक्षीने’ असे अफलातून वक्तव्य करून सत्ताधार्‍यांनी सर्वसाधारण सभेत धमाल उडवून दिली. उपमहापौर संजय जोशी यांनी रागाच्या भरात केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना सदस्यांनीही डोक्याला हात मारून घेतला. फेबु्रवारी-२०१४ मध्ये शहरातील १२५ जागा ‘रिलायन्स फोर-जी’चे टॉवर उभारण्यासाठी भाड्याने देण्याचा ठराव स्थायी समितीने ऐनवेळी मंजूर केला. सभेसमोर ठराव न आणता मंजुरी देणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली. स्थायी समिती व सभापती नारायण कुचे यांनी मंजूर केलेला ठराव सभेने हाणून पाडला. स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव स्थगित करण्याचे आदेश महापौर कला ओझा यांनी दिले. आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी ठराव स्थगित करण्यात येईल, असे सांगितले. ब्रॉडबँड वायरलेस अ‍ॅक्सेस सर्व्हिसेस (४-जी) या सेवेकरिता शहरातील रस्त्यांवर आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी रिलायन्स जीवो इन्फ ोकॉम लि., मुंबई यांना सशर्त परवानगी दिली. संबंधितांनी रस्ते दुरुस्तीसाठी २४ कोटी १६ लाख मनपाला दिले आहेत. त्या संस्थेने ग्राऊं ड बेस्ड टेलिकॉम मास्टस् उभारणीसाठी परवानगी मागितली. स्मशानभूमी, उद्यान, इतर खुल्या जागा, वाहतूक बेट, इमारतीसभोवतालच्या परिसरातील २ बाय २ मीटरची जागा ३० वर्षे कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देऊन रेडिरेकनर दरानुसार भाडे आकारण्यास मंजुरी देण्यात आल्याने मनपातील राजकीय वातावरण आज तापले. रिलायन्ससारख्या मल्टीनॅशनल कंपनीला महाराष्ट्र मनपा अधिनियमातील कलम १९ ब मधील तरतुदीनुसार १२५ ठिकाणची जागा ३० वर्षांसाठी भाडेकरारावर देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मुळात या कलमानुसार टपरीधारकाला एखादी जागा देण्याचा ठराव ५० हजारांच्या आत भाडेकरारावर सभेची मंजुरी न घेता पारित करता येतो. कंपनीला प्रशासनाने त्या कलमाखाली जागा दिल्यामुळे सदस्य राजू शिंदे, गटनेता अफसर खान, त्र्यंबक तुपे, गिरजाराम हाळनोर, डॉ.जफर खान, मीर हिदायत अली यांनी प्रशासनाला जाब विचारला. मनपा अधिनियम कलम १९/ब प्रमाणे जागा देण्याचा ठराव केला. स्थायी समितीला त्याचा अधिकार आहे. रिलायन्स कंपनीला ४ जी चे आॅप्टीकल केबल टाकण्यासाठी मनपाने परवानगी दिली आहे, असे शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी सभागृहात सांगितले. त्यांचा हा खुलासाच सभागृहात वातावरण तापविण्यास कारणीभूत ठरला.