शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

देवगावरंगारीचा जवान अनंतात विलीन; ‘अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 19:20 IST

भारतीय सेना सेवेत युनिट ११९ असॉल्ट इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेला हा वीर जवान ७ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाला होता.

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी हिमस्खलन होऊन त्याखाली दबून वीर जवान शहीद झाला होता.

देवगावरंगारी : देवगावरंगारी येथील भूमिपुत्र ऋषिकेश अशोक बोचरे हे लेह-लडाखमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली होती. या जवानाला गुरुवारी (दि.१४) रात्री ८ वाजेच्या सुमारास मार्केट कमिटी परिसरात शासकीय इतमामात हजारो उपस्थितांनी साश्रुनयनांनी निरोप दिला. यावेळी ‘ऋषिकेश बोचरे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

भारतीय सेना सेवेत युनिट ११९ असॉल्ट इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेला हा वीर जवान ७ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाला होता. जम्मू-काश्मीरमधील लेह-लडाख येथे कार्यरत असताना मंगळवारी सकाळी हिमस्खलन होऊन त्याखाली दबून वीर जवान शहीद झाला होता. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान विशेष विमानाने या जवानाचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आले. येथे लष्करी अधिकारी, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार, पोलीस अधिकारी यांच्यासह मान्यवरांनी मानवंदना दिल्यानंतर जवळपास रात्री ७.१५ वाजेच्या सुमारास देवगावरंगारी येथे पार्थिव पोहोचले. याप्रसंगी ‘ऋषिकेश बोचरे अमर रहे’च्या घोषणांनी अवघे गाव दणाणून गेले होते. यावेळी गावकऱ्यांनी गावात मोठमोठे बॅनर लावून आपल्या लाडक्या जवानाप्रती भावना व्यक्त केल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारोंच्या संख्येने उभ्या असलेल्या नागरिकांनी पाणवलेल्या डोळ्यांनी  सलामी दिली. जवानाच्या राहत्या घरासमोर पार्थिव येताच पत्नी प्रियांका बोचरेसह, आई, वडील, आजी, भाऊ, बहीण, आप्तस्वकीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी उपस्थितांनाही अश्रू आवरणे कठीण झाले. घरापासून फुलांनी सजवलेल्या वाहनात जवानाच्या अंत्ययात्रेला सुरुवात होताच ‘ऋषिकेश बोचरे अमर रहे’च्या घोषणा देत, तसेच पुष्पवर्षाव करून हजारो उपस्थितांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

पुतण्या सोनू बोचरे याने दिला जवानाच्या पार्थिवाला अग्निडाग मार्केट कमिटीत उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याजवळ लष्करी अधिकाऱ्यांनी तीन फैरी झाडून वीर जवानाला मानवंदना दिली. त्यानंतर लष्करातील अधिकाऱ्यांनी जवानाच्या पत्नीकडे फ्लॅग सोपविला. उपस्थित लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. ४त्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांनी पुतण्या सोनू रावसाहेब बोचरे याने जवानाच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा देत अनंतात विलीन झालेल्या जवानाचा निरोप घेतला. या जवानाच्या पश्चात पत्नी, आजी, आई, वडील, भाऊ, बहीण व भावजय, असा परिवार आहे............

टॅग्स :MartyrशहीदSoldierसैनिकAurangabadऔरंगाबाद