शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नियतीने जणू दिला दुसरा श्वास; काश्मीरमधून अनेक छ. संभाजीनगरकरांचा परतीचा प्रवास सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:07 IST

मरणाच्या छायेतून जीव वाचला, अशा शब्दात काश्मीरमध्ये अडकलेल्या आणि सुखरूप परतीचा प्रवास करणाऱ्या शहरवासीयांनी आपली भावना व्यक्त केली.

छत्रपती संभाजीनगर : हसतमुख चेहऱ्यांनी काश्मीरची स्वप्नवत सफर सुरू केली. हिमाच्छादित पर्वतरांगांमध्ये मनमुराद क्षण टिपत असतानाच, एका क्षणात काळजाचा ठोका चुकविणारी दहशतवादी हल्ल्याची बातमी आली. क्षणातच आनंदाने भरलेली स्वप्नांची यात्रा, भीतीच्या सावटाखाली आली. सुदैवाने आम्ही हल्ल्याच्या ठिकाणी नव्हतो. ही केवळ सुदैवाची बाब नव्हे, तर नियतीने दिलेला जणू दुसरा श्वास आहे. मरणाच्या छायेतून जीव वाचला, अशा शब्दात काश्मीरमध्ये अडकलेल्या आणि सुखरूप परतीचा प्रवास करणाऱ्या शहरवासीयांनी आपली भावना व्यक्त केली.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. पर्यटनासाठी शहरातून मोठ्या संख्येने शहरवासीय काश्मीरला गेले. या हल्ल्याच्या घटनेत छत्रपती संभाजीनगरचे अनेक नागरिकही थोडक्यात बचावले. ठिकठिकाणी नागरिक अडकून पडले. यातील अनेकांनी गुरुवारी परतीचा प्रवास केला.

डाॅक्टरांसह अनेक नागरिककॅन्सरतज्ज्ञ डाॅ. वरुण नागोरी, पूजा नागोरी, प्रिशा नागोरी, विहा नागोरी, अभिषेक मालपाणी, श्रद्धा मालपाणी, लक्ष मालपाणी, ध्रुव मालपाणी, दिपेश जाजू, स्नेहा जाजू, तरंग जाजू, ध्रूव जाजू, डाॅ. अभिषेक राठी, डाॅ. वर्षा राठी, इनाया राठी, ऋदय राठी, अभिषेक मोदानी, पायल मोदानी, अंश मोदानी, अनीश मोदानी, दिनेश ताठे, मनीषा ताठे, जिज्ञासा ताठे, मनोहर भोले, अदिती भोले, अक्षदा भोले यांनी गुरुवारी श्रीनगर विमानतळावरून परतीचा प्रवास केला.

सुदैवाने सुखरुप१९ तारखेला आम्ही काश्मीरला गेलो. अशात दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आणि आम्ही अडकलो. सुदैवाने आम्ही सुखरूप आहोत. या सगळ्या धावपळीत खूप थकलो. परतीच्या वाटेवर आहोत.- डाॅ. वरुण नागोरी

आम्ही जाण्यापूर्वीच हल्लाशहरातून आम्ही शनिवारी काश्मीरला आलो. जेथे हल्ला झाला, त्या पहलगामला आम्ही जाणार होतो. पण, त्याआधीच हल्ला झाला. आम्ही हाॅटेलमध्ये थांबलो. तेथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: आम्हाला घेण्यासाठी आले होते. त्यांनी व्यवस्था केली आणि त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.- डाॅ. अभिषेक राठी

सरकारचे आभारआम्ही सुरक्षित राहिलो. परतीच्या प्रवासासाठी श्रीनगर विमानतळावर वाट पाहात थांबलो आणि अखेर गुरुवारी सायंकाळी विमानाने मुंबईसाठी निघालो. महाराष्ट्र सरकार, सर्व अधिकारी आणि प्रतिनिधींचे आभार.- दिनेश ताठे

हल्ला झालेल्या परिसरातून शहरातमोहन पारगावकर, मंजुषा पारगावकर हे शहरात सुखरूप परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पारगावकर दाम्पत्य हे अलीकडच्या परिसरात होते.

काही जण अजून अडकलेलेकाही जण अजूनही काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. त्यात शहरवासीयांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. काही शहरवासीय हल्ला झालेले ठिकाण वगळता इतर भागातील पर्यटनाच्या ठिकाणी जात असल्याचे टूर व्यावसायिकांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला