शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

निधी मंजूर असूनही औरंगाबाद जिल्हा परिषदेला औषधी खरेदीसाठी मिळेना वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 11:55 AM

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या उदासीन धोरणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे औषधांच्या प्रतीक्षेत

ठळक मुद्देनिधी मिळविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे हेलपाटेऔषधी खरेदीसाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर

औरंगाबाद : मागील सहा महिन्यांपासून औषधी खरेदीसाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर असूनदेखील केवळ जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या उदासीन धोरणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे औषधांच्या प्रतीक्षेत आहेत.  विशेष म्हणजे, १० डिसेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधी पुरविण्यासाठी ५० लाख, तर २७९ उपकेंद्रांना ४० लाख रुपयांच्या निधीतून औषधी खरेदी करण्यास सभागृहाने प्रशासकीय मान्यता दिली. महिन्याचा कालावधी लोटला; पण औषधी खरेदीसाठी अजूनही निविदा प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. 

मागील पंधरा दिवसांपासून कडाक्याची थंडी व थंड हवा सुटल्यामुळे सर्दी, खोकला, मलेरिया व तापाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा असून, रुग्णांच्या खिशाला कात्री लागत आहे. एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी, ग्रामीण भागातील कष्टकरी, सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. 

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी गिते यांनी सांगितले की, औषधी खरेदीसाठी स्थायी समितीने ९० लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. त्यानंतर हा निधी मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यानच्या कालावधीत निविदा प्रक्रियेसाठी औषधी खरेदीची संचिका वित्त विभागाला सादर केलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा दिलासा

यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी सांगितले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ५० लाख रुपयांच्या निधीतून औषधी खरेदी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना औषधांचा पुरवठा होत आहे. सध्या तरी जिल्ह्यात कुठेही औषधांची तेवढी टंचाई जाणवत नाही. शासनाकडूनही औषधांचा पुरवठा होत आहे.

एवढा काळ लागतोच कसायासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी आरोग्य विभागाच्या धीम्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. औषधी खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता देऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे; पण अजून त्यासंदर्भात खरेदीची कसलीही हालचाल झालेली नाही. एवढा काळ लागतोच कसा. औषधी खरेदीसाठी तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना डोणगावकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल