शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

औरंगाबादमधील राष्ट्रीय विधि विद्यापीठ सुविधांपासून वंचित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 13:27 IST

मुंबई, नागपूरच्या विधि विद्यापीठांचा विकासात वेग

ठळक मुद्देसुविधांचा अभाव राज्य शासनाचे दुर्लक्ष

- राम शिनगारे 

औरंगाबाद : मराठवाड्यातील नागरिकांनी दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संघर्ष करून मिळविलेले महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ दोन शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही भौतिक सुविधांपासून वंचित आहे. मागील सहा महिन्यांपासून विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू, कुलसचिवसुद्धा मिळालेला नाही. स्वतंत्र इमारत, वर्ग खोल्या, वसतिगृहे, प्रशासकीय इमारतीसह जमिनीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे हे विद्यापीठ बंद पडते की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

औरंगाबादेत महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी केली होती. त्यानंतर हा विषय अनेक वेळा चर्चेत आला. मात्र, मराठवाड्याला न्याय मिळाला नाही. शासनाने अनेक वेळा विधिमंडळात घोषणा केली. तरीही विद्यापीठ स्थापन झाले नाही. नागपूर, मुंबई येथे विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीने जोर धरल्याने युती शासनाने औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई येथे राष्ट्रीय विधि विद्यापीठांची स्थापना करण्याची घोषणा केली. मुंबई व नागपूर येथील विद्यापीठांची स्थापना होऊन कार्यान्वित झाल्यानंतरही औरंगाबादेतील विद्यापीठ सुरू करण्यात आले नाही. केंद्र शासनाने घोषणा केलेल्या आयआयएमची स्थापना औरंगाबादेत करण्याच्या मागणीसाठी उद्योजकांचे आंदोलन सुरू असतानाच आयआयएम ही संस्था नागपूर येथे स्थापन करण्यात आली. त्याचवेळी मराठवाड्यातील नागरिकांचा रोष निर्माण होऊ नये म्हणून विधि विद्यापीठ, आर्कि टेक्ट संस्था सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. यानुसार विधि विद्यापीठाच्या कुलगुरू पदी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी भोपाळ येथील डॉ. एस. सूर्यप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी १६ मार्च रोजी पदभार स्वीकारला. 

तत्पूर्वी तत्कालीन उच्च शिक्षण सचिव सीताराम कुंटे यांनी विधि विद्यापीठ सुरू करण्यासाठी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या इमारतीमधील काही भाग ताब्यात घेतला. तेव्हा दोन वर्षांच्या आत विधि विद्यापीठाची स्वतंत्र इमारत उभी करण्याचा मनोदय व्यक्त केला. मात्र, अद्याप विधि विद्यापीठाच्या जमिनीचा प्रश्न मिटलेला नाही. दोन शैक्षणिक सत्रे संपली तरी ‘बी. ए. एल. एल. बी.’ हाच अभ्यासक्रम सुरू आहे. पदव्युत्तरचा अभ्यासक्रम सुरू केलेला नाही. सध्या दोन बॅच शिक्षण घेत आहेत. यावर्षी तिसऱ्या बॅचला प्रवेश दिल्यानंतर विद्यार्थ्यांना कोठे बसवावे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय पूर्णवेळ प्राध्यापक, कर्मचारी, स्वतंत्र आस्थापना           अद्यापही अस्तित्वात आलेली नाही. पहिल्या वर्षी मिळालेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दुसऱ्या वर्षी मिळालेला नाही. तिसऱ्या वर्षी पूर्वीपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विद्यापीठातील प्राध्यापक, हितचिंतक विधिज्ञ व्यक्त करत आहेत.

सहा महिन्यांपासून प्रभारी कुलगुरूडॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा २० डिसेंबर २०१८ रोजी दिला आहे. तेव्हापासून प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. जे. कोडय्या हे कार्यरत आहेत. विधि विद्यापीठातील ते एकमेव प्रोफेसर आहेत. त्यांचा परीविक्षाधिन (प्रोबेशन) कालावधी पूर्ण झालेला नाही. प्रभारी कुलसचिव प्रा. अशोक वडजे हे सहायक प्राध्यापक आहेत. त्याचेही प्रोबेशन पूर्ण झाले नाही. यामुळे शासनाकडून निधी मिळविणे, जमीन, इमारती बांधकाम आदी प्रश्न प्रलंबित आहेत.

जमिनीचा शासनादेश निघाला; पण ताबा मिळेनाविधि विद्यापीठाला स्थापनेपूर्वीच करोडी भागातील ५० एकर जमीन शासनाने उपलब्ध करून दिली होती. मात्र, याठिकाणी पाणी उपलब्धता नसल्यामुळे तत्कालीन कुलगुरूंनी ही जमीन नाकारली होती. शासनाने कांचनवाडी परिसरात दिलेल्या आठ एकर जमिनीला लागून असलेल्या वाल्मी संस्थेची जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. विद्यापीठाच्या कार्यकारी समितीवर असलेले मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बोर्डे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर वाल्मीकडून विधि विद्यापीठाला जमिनी हस्तांतरण करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र, अद्याप जमिनीचा ताबा विधि विद्यापीठाला मिळालेला नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे.

विधि विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सतत करण्यात येत आहे. शासन लवकरच त्यास मान्यता देईल, अशी आशा आहे.- प्रा. अशोक वडजे, प्रभारी कुलसचिव, विधि विद्यापीठ

टॅग्स :National Law Universityनॅशनल लॉ युनिव्हर्सिटीAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र