हिंगोली : विजयी उमेदवार आ. राजीव सातव आणि महायुतीचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे वगळता अन्य एकाही उमेदवाराला अनामत राखता आली नाही. त्यात बसप, भारिप, आप यांच्यासह २१ उमेदवारांचा समावेश आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात सुभाष वानखडे आणि आ. राजीव सातव यांच्यात खरी लढत झाली. सुरूवातीपासून या दोघांत अपेक्षित लढत असल्यामुळे इतर उमेदवार किती मताधिक्य घेवून प्रमूख उमेदवारांना अडचणीत आणू शकतात, याचाच खल होता. प्रामुख्याने तीन जिल्ह्यांत विभागलेल्या या मतदार संघात जनतेपर्यंत पोहचताना उमदवारांची दमछाक झाली होती. प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे गणित असल्यामुळे अपक्षांकडून मतविभागणी होणार असल्याचे सांगितले जात होते. मागील निवडणुकांत बहुजन समाज पक्ष आणि अन्य पक्षांनी लाखांच्यावर मताधिक्य घेवून प्रभाव सिद्ध केला होता. अशातच राजकीय पटलावर नव्याने उदयास आलेल्या आम आदमी पक्षाचे भय सर्वांच वाट होते; परंतु निवडणुकीच्या निकालात सर्वांचे पितळ उघडले पडले. थोडेफार आस्तीत्व असलेले बसप, आप आणि भारिपच्या उमेदवाराला देखील अनामत राखता आली नाही. आपचे उमेदवार विठ्ठल कदम यांचा फुगा फुटला. तर भारिपचे राठोड आणि बसपचे चुन्नीलाल जाधवांनी अनामत न राखल्याची नामूष्की ओढावून घेतली. (प्रतिनिधी)
२१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
By admin | Updated: May 19, 2014 00:15 IST