शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासोबत आता डेंग्यूचाही धोका; खबरदारी म्हणून दोन्ही टेस्ट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 19:17 IST

Dengue with corona in Aurangabad : २०१९ मध्ये औरंगाबाद शहरात डेंग्यूने धूमाकुळ घातला होता. हजारापेक्षा अधिक रुग्ण तेव्हा आढळले होते.

ठळक मुद्देडेंग्यू आणि कोरोना एकाच वेळी येण्याचा धोकादोन्ही आजारात काही लक्षणे सारखीच

औरंगाबाद : कारोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी खबरदारी म्हणून शहरात दररोज दोन हजारपेक्षा अधिक संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. एखाद्या रुग्णाला ताप असेल तर त्याची डेंग्यू टेस्टही करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. आतापर्यंत ६ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. पावसाळ्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जातेय.

तिसरी लाट कधी येईल, यासंदर्भात आयएमआरने अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात आपला अंदाज व्यक्त केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना ही लाट ऑगस्ट अखेरीस येईल, असे वाटते आहे. शहरात, जिल्ह्यात डेल्टा प्लस किंवा तत्सम असा कोणताही व्हायरस आढळलेला नाही. मुंबईत किंचीत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. तिसऱ्या लाटेचे हे संकेतही असू शकतात, असे मनपाला वाटते आहे. त्यामुळे डेंग्यू आणि कोरोना एकाच वेळी येण्याचा धोका वाढत चालला आहे. 

२०१९ मध्ये औरंगाबाद शहरात डेंग्यूने धूमाकुळ घातला होता. हजारापेक्षा अधिक रुग्ण तेव्हा आढळले होते. ६७ पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यूही झाला होता. मागील वर्षी डेंग्यूचे रुग्ण सापडले नव्हते. यंदा रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांना यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. डेंग्यूची स्वतंत्र टेस्ट केली जाते. या टेस्टला आयजीएम म्हणतात. टेस्टमुळे रुग्ण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे लक्षात येते.

दोन्ही आजारात काही लक्षणे सारखीचकोरोनाच्या संशयित रुग्णाला ताप येतो. डेंग्यू रुग्णालाही ताप असतो. ताप असलेले रुग्ण महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर आल्यास कोरोना आणि डेंग्यू टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांचे ऑक्सिजन कमी होऊ लागते. डेंग्यूमध्ये असे होत नाही. पण प्लेटलेट्‌स झपाट्याने कमी होतात. फुप्फुसात पाणी साचते. त्यामुळे या दोन्ही आजारांपासून बचाव करणे हाच मोठा उपाय असल्याचे आरोग्य विभागाने कळविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdengueडेंग्यूAurangabadऔरंगाबाद