शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

डेंग्यूसदृश्य तापीने जळगावात महिलेचा मृत्यू

By admin | Updated: September 25, 2014 00:53 IST

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे डेंग्यूसदृश्य तापाने मंगळवारी एका महिलेचा मृत्यू झाला. या तापाचा गावातील हा दुसरा तर जिल्ह्यातील सहावा बळी आहे.

जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे डेंग्यूसदृश्य तापाने मंगळवारी एका महिलेचा मृत्यू झाला. या तापाचा गावातील हा दुसरा तर जिल्ह्यातील सहावा बळी आहे.छाया सुभाष निकम (वय ४०) असे या मृत महिलेचे नाव आहे. गेल्या दीड महिन्यापासून या परिसरात डेंग्यूसदृश्य तापाने रुग्ण फणफणत आहेत. अशा रुग्णांनी परिसरातील दवाखाने भरलेले आहेत. छाया निकम या महिलेला ताप आल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निकम यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहा ते बारा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. निकम यांना डेंग्यूसदृश्य तापाची लागण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास छाया निकम यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.दरम्यान, या साथरोगाने जळगाव सपकाळ व परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असून साथरोगाचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पथक येते, घरोघर तपासणी, धूरफवारणी करून निघून जाते.मात्र नंतर या विभागाचे दुर्लक्ष होते, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.गावात व परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाले असून दुर्गंधी सुटली आहे. या साथरोगानंतरही तेथे स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)जालना जिल्ह्यात गेल्या एक-दीड महिन्यापासून भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ, पद्मावती, कोदोली, अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव, वाघलखेडा इत्यादी परिसरात अनेक रुग्ण डेंग्यूसदृश्य तापाने फणफणले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तापाचा हा प्रकार कोणता, हे अधिकृतरित्या अद्यापही स्पष्ट केलेले नाही.