शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

देना, विजया बँकेचे बडोदा बँकेत विलीनीकरणानंतर विभागात ८९ शाखा अतिरिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 15:01 IST

मराठवाड्याचा स्वतंत्र विभाग करण्याचाही प्रस्ताव

औरंगाबाद : विभागात देना बँक व विजया बँकेच्या मिळून १०० शाखा आहेत तर बँक आॅफ बडोद्याच्या ८९ शाखा आहेत. विभागात १०० शाखा असाव्यात अशी नियमावली आहे. यामुळे ८९ शाखा अतिरिक्त ठरणार आहेत. यातील काही टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील. जेथे शाखा नाही तेथे नवीन शाखा उघडण्यात येतील. तसेच मराठवाड्याचा स्वतंत्र विभाग करण्यात यावा, असा प्रस्तावही तयार केला असल्याची माहिती बडोदा बँकेचे उपमहाव्यवस्थापक व विभागप्रमुख सुरेंद्र शर्मा यांनी दिली. 

देना व विजया बँकेचे १ एप्रिलपासून विलीनीकरण होऊन बँक आॅफ बडोदा ही राष्ट्रीयीकृत क्षेत्रातील देशातील दुसरी मोठी बँक बनली आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत शर्मा यांनी सांगितले की, मराठवाडा, अहमदनगर, नाशिक, नंदूरबार, धुळे या सर्वांचा मिळून एक विभाग होतो. बडोदा बँकेची १० हजार कोटी तर देना व विजया बँक मिळून ७ हजार कोटी, अशी वार्षिक १७ हजार कोटींची उलाढाल होत आहे. विभागात ३ बँकेचे मिळून आता २ हजार कर्मचारी झाले आहेत. तीन महिने आॅडिट सुरू राहणार आहे. त्यानंतर उलाढालीची एकूण आकडेवारी समोर येईल. वर्षभरानंतर अतिरिक्त शाखा बंद होतील 

ज्या ठिकाणी देना, विजया व बडोदा बँकेच्या शाखा जवळ आहेत, त्या ठिकाणी ज्या शाखेची उलाढाल सर्वात कमी आहे, ती शाखा बंद करण्यात येईल. तसेच मंठा, माजलगाव, मालेगाव, केज आदी ठिकाणी शाखा नाहीत, त्याठिकाणी नवीन शाखा सुरू करण्यात येतील. आयटीचे एकीकरण १२-१८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल. विलीनीकरणाची प्रक्रिया सहजतेने करण्यात येईल. यामुळे देना व विजया बँकेच्या ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक के. सुब्रमणियन यांची उपस्थिती होती. 

जिल्ह्यात देना, विजया बँकेची वार्षिक ७०० कोटींची उलाढालऔरंगाबादेत देना बँकेच्या अदालत रोड, शेंद्रा, पिंपळवाडी, लोहगाव व बंगला तांडा, अशा ५ शाखा आहेत. २ एटीएम आहेत व वार्षिक ५०० कोटींची उलाढाल व ३० कर्मचारी आहेत. तर विजया बँकेच्या विवेकानंद महाविद्यालय रस्ता, गारखेडा व वाळूज, अशा तीन शाखा आहेत. ३ एटीएम आहेत.  वार्षिक उलाढाल २०० कोटींची व २० कर्मचारी कार्यान्वित आहेत. 

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबाद