शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मिरवणूकीसह युद्ध कलेचे प्रात्यक्षिक; क्रांतीचौकात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

By बापू सोळुंके | Updated: June 6, 2023 12:45 IST

पालखीत छत्रपती शिवरायांचा छोटा पुतळा होता. पारंपारिक वेशभूषेतील शिवरायांचे मावळे यात सहभागी झाले होते.

छत्रपती संभाजीनगर: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने शहरातील क्रांती चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने क्रांतीचौकात मेघदंबरीवर विराजमान छत्रपती शिवरायांचा पुतळा या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. 

या सोहळ्यानिमित्त 18 पगड जातीतील 21 जोडप्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या जोडप्यांचे हस्ते शिवराज्याभिषेक करण्यात आला. अभिषेकासाठी शरयू, गंगा, काशी, कुशवरता नदीचे पाणी आणण्यात आले होते. पुरोहित सुभाष मुळे यांच्या हस्ते पाच ब्राह्मणांच्या उपस्थितीत हा अभिषेक करण्यात आला. यावेळी 351 नाण्यांचा अभिषेक आणि राजयोग, महारथी, पूजन करण्यात आले.

रणरागिणी ग्रुपतर्फे लाडू वाटप शहरातील रागिनी शिवाज्ञा प्रतिष्ठान महिला ग्रुपच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 3501 लाडू वाटप करण्यात आले. हे  लाडू शहरातील विविध अनाथ आश्रमात आणि क्रांती चौकात वाटप करण्यात आले.

शिवकालीन युद्ध कलेचे सादरीकरण शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त जयसिंग होलीये यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिक सादर केले.यात तलवार, दांडपट्टा, छडीपट्टा, चक्र, तुतारी,भालदार, चोपदार ,नगारे, ढोल ताशे यांचा सहभाग होता.

पालखी मिरवणूकला प्रतिसादशिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी काढण्यात आली. या पालखीत छत्रपती शिवरायांचा छोटा पुतळा होता. पारंपारिक वेशभूषेतील शिवरायांचे मावळे यात सहभागी झाले होते.

सोहळ्यासाठी यांनी घेतला पुढाकार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मध्य विभागाचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी सोहळ्याचे आयोजन केले होते .माजी खासदार चंद्रकांत खैरे ,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार कल्याण काळे माजी महापौर नंदू घोडेले, राजू वैद्य ,बंडू ओक, प्राध्यापक चंद्रकांत भरात आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAurangabadऔरंगाबादkranti chowkक्रांती चौक