शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:26 IST

शिवसेनेने जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडावी. अध्यक्षपदाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो नंतर घेता येईल; परंतु सध्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर करावे. यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची तातडीने भेट घेण्यात येईल, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केले.

ठळक मुद्देभाजपचे मत: प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन करणार जिल्ह्यातील राजकारणाबाबत चर्चा

औरंगाबाद : शिवसेनेने जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडावी. अध्यक्षपदाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो नंतर घेता येईल; परंतु सध्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर करावे. यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची तातडीने भेट घेण्यात येईल, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केले.लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा झाल्यानंतर राज्यात ज्या ठिकाणी जि.प.,पंचायत समित्या किंवा नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सेना किंवा भाजपसोबत केलेली अभद्र आघाडी तात्काळ तोडण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.पक्षादेशानुसार काँग्रेस भूमिका घेणार आहे, तर भाजपच्या गोटातून देखील तशीच प्रतिक्रिया युती झाल्यानंतर दिली होती. जि.प. अध्यक्षांचा कार्यकाळ तीन महिने राहिला आहे. यासंदर्भात पक्षनेत्यांच्या आदेशानुसार निर्णय होईल, असे शिवसेनेचे मत आहे.जिल्ह्यात जि.प., औरंगाबाद पंचायत समिती, कन्नड पंचायत समिती, सोयगाव पंचायत समितीमध्ये शिवसेना काँग्रेससोबत आहे, तर वैजापूर पंचायत समितीमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीची आघाडी आहे. जिल्ह्यातील या संस्थांतील शिवसेना आणि भाजपने सोयीनुसार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केलेली असली तरी आगामी काळातच त्याबाबत निर्णय होणार आहे, तर जिल्हा परिषदेसह कन्नड, सोयगाव व वैजापूर पंचायत समित्यांमधील सत्ता समीकरण बदलणे शक्य आहे.प्रदेशाध्यक्षांना भेटणारयुती झाली हे चांगलेच झाले आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमताने काम करतील; परंतु काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेने जिल्हा परिषदेत व जिल्ह्यातील संस्थांमध्ये स्थापन केलेल्या सत्तेतून बाहेर पडावे, ही भाजपची भूमिका आहे. भाजप जिथे-जिथे राष्ट्रवादीसोबत असेल, त्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत. यासाठी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली जाईल, असे उपाध्यक्ष डॉ. कराड यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना