शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

३० दिवसांत घरे खाली करा, अर्ध्या गावाला महसूल विभागाची अतिक्रमणाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 12:56 IST

दोनशेहून अधिक कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण

चितेगाव : पैठणखेडा (ता. पैठण) येथील अर्ध्या गावाला महसूल विभागाने गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचे कारण सांगून ३० दिवसांत घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे गावातील सुमारे दोनशे कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी पालकमंत्री संदीपान भुमरे यांची या लोकांनी भेट घेऊन निवेदन दिले.

गावातील सुमारे दोनशे कुटुंब १९६२ पासून गायरान जमिनीवर राहत आहेत. यातील बहुतांश कुटुंबांना शासनाने विविध शासकीय योजनेंतर्गत गायरान जमीन गट क्र. ११ व १२ मध्ये जागा दिली होती. मात्र, पूर्वीचे अशिक्षित लोकं असल्यामुळे त्यांनी जागा दिल्याचा ना पुरावा मागितला ना तहसील कार्यालयाने त्यांना दिला. मात्र, या ग्रामस्थांची नोंद ग्रामपंचायतमध्ये आठ ‘अ’मध्ये घेण्यात आली आहे. याच गटामध्ये जि. प. शाळा, अंगणवाडी, ग्रा. पं. कार्यालय, आहे. तसेच ग्रामपंचायतने येथे नळ, पाणी सारख्या सुविधाही पुरविल्या आहेत. असे असताना महसूल प्रशासनाने दिलेल्या नोटिसीवरून ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे त्यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

शासनाने नोंद घ्यावी शासनाने या नागरिकांना जागा दिली; पण साताबार उताऱ्यावर आज ही गट क्र. ११ व १२ वर सरकारचे नाव आहे. या नागरिकांना विविध शासकीय योजनेंतर्गत दिलेल्या जागेचे क्षेत्र सदरील सातबाऱ्यातून कमी केलेले नाही. त्यामुळे सातबाऱ्यावर आजही गायरान क्षेत्र दिसत आहे. शासनाने चौकशी करून येथे राहत असलेल्या ग्रामस्थांच्या नावावर मालकी हक्काची नोंद घ्यावी.- सज्जन भुजंग, उपसरपंच, पैठणखेडा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEnchroachmentअतिक्रमणRevenue Departmentमहसूल विभाग