गुलमंडीकडून कुंभारवाडा - अंगुरीबाग- सुपारी हनुमान मंदिरकडे जाणारा रस्ता जिथे एकत्र येऊन मिळतो त्या चौफुलीवर दुकानदार व हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे दिवसा या रस्त्यावरून कधी जा वाहतूक जाम असते. याच चौफुलीवर गड्डा पडलेला आहे. तिथे वाहने स्लिप होतात. गेअर टाकण्याचा अंदाज न आल्याने वाहने बंद पडतात तेव्हा पाठीमागून येणारे वाहने समोरील वाहनाला धडकतात, असेही प्रकार घडत आहेत. अरुंद गल्ली व त्यात अतिक्रमण यामुळे येथे सतत वाहतूक जाम होत असते. पायी चालणेही कठीण जाते. अशीच परिस्थिती अँगुरीबाग ते सिटीचौकपर्यंतची आहे. या रस्त्याचे रुंदीकरणं करण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
अतिक्रमण हटविण्याची मागणी
By | Updated: November 29, 2020 04:04 IST