शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

चणेफुटाणे विक्रेत्यास हप्त्याची मागणी; वाद चिघळून दोन गट लाठ्याकाठ्या, तलवारीसह भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 16:19 IST

crime news in Aurangabad या हाणामारीत तलवारीने वार केल्याने एका गटाचे पाच तर दुसऱ्या गटाचे दोन जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्दे रांजणगावात दोन गटात तुंबळ हाणामारीदोन्ही गटाचे ७ जण जखमी दोन गंभीर

वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : चणेफुटाणे विक्रेत्या टपरी चालकास हप्ता मागितल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवार (दि.२५) रात्री ९.३० ते १२.३० वाजेच्या दरम्यान रांजणगावात घडली. या हाणामारीत तलवारीने वार केल्याने एका गटाचे पाच तर दुसऱ्या गटाचे दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दोन्ही गटांकडून एकमेकांना विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

अक्तर शेख (रा.रांजणगाव) याची दत्तनगर फाट्यावर चने-फुटाणे व शितपेय विक्रीची टपरी आहे. शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अक्तर हा टपरी बंद करुन मित्र तौसिफ शेख याच्या सोबत घरी चालला होता. यावेळी संतोष मासाळे (४० रा.साजापूर), सोनु मासोळे, संतोष याचा सासरा व एक नातेवाईक (नाव माहित नाही) इतर दोघांनी अक्तर यास अडविले. संतोष याने अख्तर यास तुला धंदा करायाचा असेल तर मला ५०० रुपये द्यावे लागतील असे म्हणून वाद घालण्यास सुरवात करीत अख्तर याची गच्ची धरली. या भांडणात मध्यस्थीसाठी गेलेला अख्तर याचा मित्र तौसिफ यास संतोष याने लाथ मारुन खाली पाडले. यानंतर संतोष व त्याच्या साथीदारानी अक्तर यास मारण्यासाठी धावले असता तो पळून गेल्याने त्यांनी तौसिफ शेख यास लाकडी दांड्याने मारहाण करुन त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. 

तर अर्जुन गुजर (२२ रा.रांजणगाव) याने दिलेल्या तक्रारीत संतोष मासोळे याचे रात्री अक्तर शेख व तौसिफ शेख या दोघासोबत भांडण झाले होते. या भांडणाच्या कारणावरुन अक्तर व तौसिफ यांनी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास साथीदारांना सोबत घेऊन रांजणगावात अर्जुन गुजर याच्या घरी आले. अक्तर व त्याच्या साथीदाराने अर्जुन याच्या घराचा दरवाजा तोडून त्यास लाथा बुक्याने बेदम मारहाण केली. यानंतर अर्जुन याचा चुलत मामा सखाराम शिराळे याच्या घरात घुसुन त्यांना बेदम मारहाण करीत एकाने सखाराम शिरोळे यांच्या पोटावर व पाठीवर तलवारीने वार करुन आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. या मारहाणीनंतर गंभीर जखमी सखाराम शिरोळे व अर्जुन गुर्जर या दोघांना नातेवाईकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या भांडणात अक्तर व त्याच्या साथीदारानी अर्जुन याचे नातेवाईक संजु शेषराव धोत्रे, बबड्या सखाराम मासोळे, अमृत पुंडलीक गायकवाड यांच्यावर तलवारीने वार केल्याने गंभीर जखमी आवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

तिघा गंभीर जखमीवर उपचार सुरुया मारहाणीच्या घटनेत सखाराम शिरोळे याच्या छातीवर, डोक्यावर व पाठीवर तलवारीने वार करण्यात आले आहे. तर बबन मासोळे याच्या तोंडावर व संजय धोत्रे मांडीवर तलवारीने वार करण्यात आले आहे. या तिघावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शनिवारी पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक निरीक्षक गौतम वावळे व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरुन दोन्ही ११ जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गटाच्या ८ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

भांडणानंतर ९ दुचाकी फोडल्याया भांडणात दोन्ही गटाच्या आरोपींनी घरासमोर उभ्या असलेल्या ८ दुचाकी तर दत्तनगर फाट्यावर १ दुचाकी अशा ९ फोडल्या आहेत. मध्यरात्री गावात सुरु असलेल्या या तुंबळ हाणामारीची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठुन पाहणी केली. पोलिस आल्याची चाहुल लागताच दोन्ही गटातील आरोपी घटनास्थळावर पसार झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी