शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मागणी अन् दरही वाढल्याने शेतकऱ्यांची ज्वारीला पसंती; हरभऱ्याचे पीक मोडून केली पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 17:14 IST

पिकाचे क्षेत्र वाढले ; कृषी विभागानेही केली जनजागृती

- दिलीप मिसाळ

गल्लेबोरगाव ( छत्रपती संभाजीनगर) : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ महसूल मंडळात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे पीक मोडून ज्वारीची पेरणी केली आहे. त्यामुळे ज्वारीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

खुलताबाद तालुक्यात पाच कृषी मंडळे आहेत. तालुक्याचे भोगौलिक क्षेत्र १३ हजार १९० हेक्टर असून त्यापैकी फक्त ६ हजार १७१ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. तालुक्यात रब्बी हंगामात ४ हजार ३३९ हेक्टरवर पिकांची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यात वेरूळ कृषी मंडळांत रब्बी हंगामात ८२७ हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली असून १०८ हेक्टरवर हरभरा लागवड करण्यात आली आहे. कांदा १९५ हेक्टर, मका ५५१ हेक्टर आणि ज्वारी १ हजार ५६२ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. काही क्षेत्रावर भाजीपाला व फळांची लागवड करण्यात आली आहे. ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक असून उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आता ज्वारीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच, ज्वारीला भाव देखील बाजारात चांगला मिळत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील उत्पादक शेतकरी ज्वारीच्या लागवडीला प्राधान्य देत आहेत. शासन देखील ज्वारी पेरणीला प्राधान्य देत असून ज्वारीमध्ये तांदळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्वारी खाण्यावर नागरिकांचा भर वाढल्याचे दिसत आहे.

जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोगपोषक धान्याबरोबरच ज्वारी पिकाचा कडबा म्हणून जनावरांना वैरणसाठी उपयोग होतो. उन्हाळ्यामध्ये नेहमीच पशुपालकांना चाराटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे चाऱ्याची व्यवस्था व्हावी, याकरिता अनेक शेतकरी ज्वारीची पेरणी करतात. दुभत्या जनावरांनाही हा कडबा उपयुक्त असल्याने शेतकरी दुहेरी फायदा लक्षात घेऊन ज्वारीची लागवड अधिक करीत असल्याने जाणकारांनी सांगितले.

वेगवेगळ्या वाणाची लागवड कराशेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादनात वाढ व गुरांना चारा या सर्व बाबींचा विचार करता ज्वारी पिकाची लागवड करण्यावर भर द्यायला हवा. मात्र, एकाच संकरित वाणाची लागवड न करता वेगवेगळ्या कंपनीच्या संकरीत वाणाची लागवड करणे गरजेचे आहे.- गंगाराम मुंडे, मंडळ कृषी अधिकारी, वेरूळ

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र