या परिसरात शेकडो दुकाने असून, त्यात २ हजारपेक्षा अधिक कर्मचारी काम करीत आहेत. या रस्त्यावर सतत वाहतूक जाम होत असल्याने चारचाकी घेऊन येणारे ग्राहक बाजारात येणे टाळत आहेत. पोलीस आयुक्त व मनपा प्रशासकांनी एकत्र येऊन हातगाडीसाठी जिल्हा परिषद मैदान, आमखास मैदान आदी ठिकाणी हॉकर्स झोन जाहीर करावे. तिथेच हातगाडीवाल्यांना व्यवसाय करण्याचे आदेश द्यावेत, तसेच चारचाकी, दुचाकी वाहनांना पैठणगेटपासून बाजारपेठेत येण्यास मज्जाव करू नये, असे आवाहन पैठणगेट, टिळकपथ येथील व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद मैदानावर हॉकर्स झोन करण्याची मागणी
By | Updated: November 29, 2020 04:04 IST