शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मागणी घटताच सिमेंट,स्टीलचे भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:02 IST

औरंगाबाद : मागणी घटल्याने सिमेंट व स्टीलचे भाव घसरले आहेत. मंदीला मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीही कारणीभूत असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. ...

ठळक मुद्देमंदीचा फटका : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीही कारणीभूत

औरंगाबाद : मागणी घटल्याने सिमेंट व स्टीलचे भाव घसरले आहेत. मंदीला मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीही कारणीभूत असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.व्यावसायिकांच्या मते औरंगाबाद शहरात दर महिन्याला ८० हजार टन सिमेंट, तर दीड हजार टन स्टीलची विक्री होत असते. पावसाळा सुरूहोऊन दोन महिने पूर्ण झाले तरी अजूनही जोरदार पावसाची मराठवाड्याला प्रतीक्षा आहे. दुष्काळाची परिस्थिती अजूनही कायम आहे. पाणीटंचाई असल्याने बांधकामाची गती कमी झाली आहे. दुसरीकडे देशात अनेक राज्यांत, मोठ्या शहरात पूरपरिस्थितीमुळे तिथेही बांधकाम प्रभावित झाले आहे. परिणामी, सिमेंटची मागणी घटल्याने कंपन्यांना भाव कमी करावे लागले आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी सिमेंटचे भाव ३६० ते ३८० रुपये प्रतिगोणीपर्यंत जाऊन पोहोचले होते. सिमेंटच्या भाववाढीने उच्चांक गाठला होता. मात्र, नंतर परिस्थिती बदलली गोणीमागे ३५ ते ५५ रुपयांपर्यंत भाव कमी झाले. बुधवारी ३२५ ते ३३५ रुपये प्रतिगोणी सिमेंट शहरात विकल्या जात होते. महिन्याकाठी २० हजार टनाने सिमेंटची विक्री घटल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. स्टील उद्योगही सध्या मोठ्या मंदीला सामोरा जात आहे. देशातील काही स्टील उत्पादक कंपन्याही बंद पडल्या आहेत. मागणी कमी होत असल्याने बांधकामासाठी लागणाऱ्या सळाईचे भाव टनामागे ६ हजार रुपयांनी घटले आहेत. दीड महिन्यापूर्वी ४३ हजार रुपये टनने मिळणारी सळई गुरुवारी ३७ हजार रुपये टनाने विकली जात होती.मराठवाड्यातील दुष्काळामुळे मंदी हटणे कठीणदेशभरात स्टील उद्योगात मंदी आहे. नवीन बांधकामाची संख्या कमी झाली आहे. मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने येथे आणखी परिस्थिती बिकट आहे. जर आणखी महिनाभरात पावसाने सरासरी गाठली नाही, तर बांधकाम उद्योगासाठी येता काळ कठीण राहील.विजय जैस्वालउपाध्यक्ष जिल्हा व्यापारी महासंघसिमेंटची विक्री २० हजार टनाने घटलीमार्चपर्यंत सरकारी कामे जोरात सुरूअसल्याने त्या काळात सिमेंटच्या किमतीने उच्चांक गाठला होता. आजघडीला देशात काही भागात पूरपरिस्थिती व काही भागात दुष्काळ असल्याने या दोन्हींचा परिणाम सिमेंट विक्रीवर झाला आहे. औरंगाबादचा विचार केल्यास महिन्याकाठी २० हजार टनाने सिमेंटची मागणी घटली आहे.मनोज रुणवालअध्यक्ष औरंगाबाद सिमेंट डीलर्स असोसिएशन

टॅग्स :AurangabadऔरंगाबादConsumer Goodsग्राहकोपयोगी वस्तू