लाडसावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आजूबाजूच्या तीस गावातील जनावरांना उपचारासाठी आणले जाते. येथील रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी ८० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, जुन्याच इमारतीच्या भिंतीचे व छताचे प्लास्टर मार्चच्या पहिल्या आठवड्यात काढून टाकण्यात आले. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी याच इमारतीची दुरुस्ती करण्यात आली होती. यात जुने प्लास्टर चांगले असतानाही केवळ दुरुस्तीचे तीन लाख रुपये मंजूर झाले. म्हणून मार्चआखेर थातूरमातूर दुरुस्ती करून निधी लाटण्याचा प्रकार सुरू आहे. गावातील नागरिकांनी बोगस कामाला विरोध केल्याने संबंधित ठेकेदाराने पशू दवाखान्याचे काम अर्धवट सोडण्यात आले. त्यामुळे सदर भिंतीचे प्लास्टर व छतावरचे प्लास्टर काढून ठेवल्याने भिंती कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वरिष्ठांनी दखल घेऊन अर्धवट सोडलेले काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत. एकीकडे कोरोना महामारीच्या पाठीवर नवीन कामाला निधी नाही. मग दुरुस्तीसाठी पैसे आले कुठून नवीन इमारतीला निधी मंजूर झाला. तर नवीन इमारतीचे तात्काळ काम सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.