शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा-गौताळा पर्यटन प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 19:42 IST

गडकिल्ले तसेच वनराईने नटलेला हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने संपन्न अजूनही दुर्लक्षित आहे.

ठळक मुद्देपर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर समृद्ध

औरंगाबाद : अजिंठा ते गौताळा या पट्ट्यात एकूण ३३ पर्यटन स्थळे आहेत. गडकिल्ले तसेच वनराईने नटलेला हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने संपन्न अजूनही दुर्लक्षित आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी अजिंठा-गौताळा टुरिझम कॉरिडॉर असावा आणि त्यासाठी विशेष पर्यटन प्राधिकरण असावे, अशा मागणीचे निवेदन दि. २८ रोजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना देण्यात आले.

यावेळी गणेशवाडी कृषी व ग्रामीण विकास संस्था उंडणगावचे अध्यक्ष आर्किटेक्ट अनिरुद्ध नाईक, जय फाऊंडेशनचे संजय कु लकर्णी यांनी यासंदर्भातील सादरीकरण तयार करून ते आयुक्तांना दाखविले. सुनील मोटे, विजय चौरंगे, विनय पाटणी, दामोदर मोरे, सदाशिव राठोड, संतोष बिसने, नंदकिशोर कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती होती.   सादरीकरणादरम्यान या भागातील निसर्ग समृद्धी पाहून आयुक्तांनी अजिंठा-गौताळा टुरिझम कॉरिडॉरसाठी प्राधिकरण स्थापन करण्याचे आश्वासन दिले. या परिसरातील स्थानिक धार्मिक पर्यटनातून होणारी आर्थिक उलाढाल याविषयीही यादरम्यान चर्चा झाली. 

मराठवाडा व खान्देश यांना विभागणाऱ्या अजिंठा डोंगररांगांची एकूण लांबी १२५ किमी असून, बुलडाणा येथील जाईचा देव येथून ते पितळखोरा पाटणादेवीपर्यंतचा हा परिसर आहे. हा संपूर्ण परिसर गौताळा अभयारण्यासाठी राखीव असून, यादरम्यान वेताळवाडीचा किल्ला, जंजाळ्याचा किल्ला, अंतूरचा किल्ला, सुतोंड्याचा किल्ला, इतिहासातील इतर सैनिकी चौक्या आहेत. यासोबतच वडाली, अजिंठा, रुद्रेश्वर, धारेश्वर, पितळखोरा हे महत्त्वपूर्ण धबधबे आहेत. 

कालदरी, भिलदरी, जाईचा देव, जगदंबा माता वाढोणा, अंबऋषी देवस्थान, रुद्रेश्वर मंदिर, मुर्डेश्वर मंदिर, कळसाई मंदिर, घाटनांद्राजवळील इंद्रगडी, जोगेश्वरी, मनूआई मंदिर, पिनाकेश्वर मंदिर, धारेश्वर मंदिर, पाटणादेवी मंदिर यासारख्या धार्मिक  स्थळांनीही हा भाग समृद्ध आहे. २५० प्रकारचे पक्षी, विविध प्रकारचे प्राणी व वनस्पतींच्या विविध जाती या भागात आढळून येतात. 

पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर समृद्ध असून, अजिंठा-गौताळा टुरिझम कॉरिडॉर पर्यटन प्राधिकरणामुळे या भागातील पर्यटन क्षेत्रातील विस्कळीतपणा दूर होऊन पर्यटकांची ये-जा सुरू होईल आणि यातून रोजगार निर्मिती होईल, असे म्हणणे यावेळी मांडण्यात आले.

टॅग्स :tourismपर्यटनAjantha - Elloraअजंठा वेरूळforestजंगल