शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

औरंगाबादेत महात्मा फुले सन्मान पुरस्कार थाटात प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:35 IST

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त औरंगपुरा येथील पुतळ्याजवळ उभारण्यात आलेल्या विचारपीठावर या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले सन्मान पुरस्काराचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते थाटात वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देमान्यवरांची निवड : फुले दाम्पत्याचा पुतळा लवकरच उभारण्याची महापौरांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त औरंगपुरा येथील पुतळ्याजवळ उभारण्यात आलेल्या विचारपीठावर या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले सन्मान पुरस्काराचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते थाटात वितरण करण्यात आले.वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक राधाकिसन शेवाळे, फकीरराव राऊत, डॉ. राजेंद्र धनवई, ज्येष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर, श्रीकांत सराफ, प्रा. सुदाम चिंचाणे, प्रा. प्रभाकर गायकवाड व सिनेट सदस्य प्रा. भारत खैरनार हे या पुरस्काराचे मानकरी ठरले. स्मृतिचिन्ह व बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.माणिक हॉस्पिटलमध्ये आग लागली असताना जीव धोक्यात घालून रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या सलमान पटेल यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे खा. वीरसिंग, आ. अतुल सावे, नगरसेविका कीर्ती शिंदे, नगरसेविका आशा निकाळजे, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, म. फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज घोडके, रामभाऊ पेरकर, रतनकुमार पंडागळे यांची मंचावर उपस्थिती होती. औरंगपुरा येथे फुले दाम्पत्याचा पुतळा उभारण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल मनोज घोडके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर महापौर घोडेले यांनी सांगितले की, अनेक तांत्रिक अडचणींवर मात करीत आता फुले दाम्पत्यांचा पुतळा उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता जिल्हाधिकारी हेच मनपा आयुक्तही आहेत. येत्या आठ दिवसांत औरंगपुरा येथे पुतळा उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल. ( टाळ्या)जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष गणेश काळे, विलास ढंगारे, निशांत पवार, संदीप घोडके, गजानन सोनवणे,चंद्रकांत पेहरकर, संजीवनी घोडके, सरस्वती हरकळ, सुभद्रा जाधव, संगीता पवार, मंजूषा महाजन, किशोर माळी, योगेश हेकाडे, संजय माळी, सुनंदा कुदळे, मुन्ना शेवाळे,विजय महाजन, प्रा. बळीराम गादगे, जावेद खान आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.... नागसेन सावदेकरांच्या गाण्यांनी धमालप्रख्यात गायक नागसेन सावदेकर यांच्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी यावेळी धमाल उडवून दिली. दोनच राजे इथे जाहले या गाण्याला सर्वाधिक पसंती मिळाली. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारिक संबंधांवर गायलेले गाणेही हिट ठरले. प्रख्यात निवेदक राजाभाऊ सिरसाट यांच्या खुमासदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. भिकन गवळी यांनी ढोलकीवर साथ दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक