शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

छत्रपती संभाजीनगराहून दिल्ली आणखी जवळ; आता सकाळी, दुपारी अन् सायंकाळीही ‘टेकऑफ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:45 IST

दुपारच्या सत्रात विमान सुरू झाल्यामुळे, छत्रपती संभाजीनगर येथून दिल्लीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा

छत्रपती संभाजीनगर : शहरातून दिल्लीसाठी एअर इंडियाचे एक आणि इंडिगोचे एक, अशी दिवसभरात २ विमाने होती. नव्या वेळापत्रकानुसार शहरातून रविवारपासून एअर इंडियाकडून दिल्लीसाठी दुपारच्या वेळेत विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे शहरातून आता दिल्लीसाठी सकाळी, दुपारी अन् सायंकाळी अशी ३ विमाने उड्डाण घेणार आहेत.

विमान कंपन्यांचे २६ ऑक्टोबर ते २८ मार्च २०२६ या काळात लागू होणारे हिवाळी सत्रातील वेळापत्रक रविवारपासून झाले. यात एअर इंडियाकडून दुपारच्या सत्रात दिल्लीसाठी एक जादा विमान सुरू करण्यात आले. आगामी काळात विमानतळावरून आणखी काही शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहेत.

दिल्ली विमानाचे वेळापत्रक- एअर इंडिया : सकाळी ६ वा. दिल्लीहून उड्डाण, सकाळी ८ वा. शहरात दाखल. शहरातून सकाळी ८:४० वा. उड्डाण व १०:३५ वा. दिल्लीत.- एअर इंडिया : दुपारी २ वा. दिल्लीहून उड्डाण, दुपारी ३:५० वा. शहरात दाखल. शहरातून सायं. ४:३० वा. उड्डाण व सायं. ६:२० वा. दिल्लीत.- इंडिगो : सायं. ४:५५ वा. दिल्लीहून उड्डाण, सायं. ६:४५ वा. शहरात दाखल. शहरातून सायं. ७:१५ वा. उड्डाण व रात्री ९:०५ वा. दिल्लीत.

पहिल्या दिवशी १५६ प्रवासीरविवारपासून दुपारच्या वेळेतील विमानातून तब्बल १५६ विमान प्रवाशांनी शहरातून दिल्लीचा प्रवास केला. दुपारच्या सत्रात हे विमान सुरू झाल्यामुळे, छत्रपती संभाजीनगर येथून दिल्लीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi closer from Chhatrapati Sambhajinagar; Flights now morning, afternoon, evening.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar now offers three daily flights to Delhi. Air India added an afternoon flight, complementing existing morning and evening services. The inaugural flight carried 156 passengers, providing greater convenience for travelers. Airport authorities are working to add more destinations.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAirportविमानतळAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ