शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

देशातील छावणी परिसराच्या कायापालटासाठी संरक्षण मंत्रालयाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:19 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशातील ६२ छावणी परिषदांमधील नागरी परिसर स्थानिक शहरांच्या मध्यवस्तीत असूनही जाचक अटी आणि नियमांमुळे खेड्यापेक्षाही वाईट अवस्थेत आहे. देशातील छावणी परिसराच्या कायापालटासाठी केंद्र शासनाने (संरक्षण मंत्रालयाने) पुढाकार घेऊन सात सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठित केली आहे.

ठळक मुद्देसात सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठित

प्रभुदास पाटोळेऔरंगाबाद : स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशातील ६२ छावणी परिषदांमधील नागरी परिसर स्थानिक शहरांच्या मध्यवस्तीत असूनही जाचक अटी आणि नियमांमुळे खेड्यापेक्षाही वाईट अवस्थेत आहे. देशातील छावणी परिसराच्या कायापालटासाठी केंद्र शासनाने (संरक्षण मंत्रालयाने) पुढाकार घेऊन सात सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठित केली आहे.ही समिती औरंगाबादसह देशातील सर्व छावणी परिषदांना प्रत्यक्ष भेटी देऊन, स्थानिक मुख्य कार्यकारी अधिकारी, लोक प्रतिनिधी (सदस्य) आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि सूचना ऐकून घेणार आहे. शिवाय छावणी परिषद कायद्याचा अभ्यास करून सद्य:स्थितीशी सुसंगत अशा सुधारणा आणि दुरुस्त्याही ही समिती सुचविणार आहे. समिती चार महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.तज्ज्ञ समितीसंरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार १७ सप्टेंबर २०१८ रोजी निवृत्त महसूल सचिव सुमित बोस (आयएएस) यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे. सदस्य म्हणून संरक्षण मंत्रालयाचे माजी सचिव टी.के. विश्वनाथन, माजी लेफ्टनंट जनरल अमित शर्मा (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम), संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव जयंत सिन्हा, संरक्षण मंत्रालयाच्या लेखा विभागाच्या प्रधान नियंत्रक देविका रघुवंशी (आयडीएएस) आणि जाधवपूर विद्यापीठातील वास्तुविशारदशास्त्र विभागामधील प्राध्यापिका डॉ. मधुमिता रॉय तसेच सदस्य सचिव म्हणून सैन्य संपदा विभागातील अतिरिक्त महा निदेशक राकेश मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.समिती खालील बाबींचा घेणार आढावाही तज्ज्ञ समिती छावणी परिषद कायद्याचा अभ्यास करून छावणी परिसरातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, नागरिकांचे संरक्षण, स्वच्छता तसेच मालमत्तांशी संबंधित बांधकामांचे नियम, एफएसआय, मालमत्तांची विक्री आणि हस्तांतरण, मालमत्ता भाडे तत्त्वावर देणे, कालबाह्य झालेल्या ‘ओल्ड ग्रँट’ (एक्सपायर्ड) बंगले व इतर मालमत्तांच्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण, मुदत संपत आलेल्या भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण, रेन वॉटर हार्व्हेस्टिंग, आगीपासून संरक्षण, आपत्ती निवारण आदी बाबींचा आढावा घेणार आहे.छावणी परिसराची सद्य:स्थितीसध्या छावणीतील नागरी परिसरातील संपूर्ण जमीन संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची असून केवळ त्यावरील बांधकाम (स्ट्रक्चर) संबंधिताच्या मालकीचे आहे. येथील मोजकीच बांधकामे मालकीची (फ्री होल्ड) असून, उर्वरित सदर बांधकामे भाडेतत्त्वावर (लीज होल्ड) आहेत. केवळ तळमजल्याच्याच बांधकामाला परवानगी आहे. मालमत्तांची विक्री आणि हस्तांतरणाचे नियम जाचक आहेत. छावणी परिसरातील बंगल्यांचे मालक आणि शेतकऱ्यांच्या मालकीहक्कांवरून वाद आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे छावणी परिषद ही केंद्र शासन संचलित स्थानिक स्वराज्य संस्था आहे. असे असताना देशातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना (सदस्यांना) असलेले कोणतेही अधिकारी छावणी परिषदेच्या सदस्यांना नाहीत. त्यासाठी सदस्यांचा केंद्र शासनाकडे पाठपुरावा चालू आहे.देशातील इतर भागांना मिळणारे राज्य आणि केंद्र शासनाचे विविध निधी आणि योजनांचा लाभही छावणी परिसराला मिळत नाहीत. परिणामी, या भागाचा विकास खुंटला असून, येथील नागरिक शहरातील इतर भागात स्थलांतरित होत आहेत. मात्र, तज्ज्ञ समिती या सर्व बाबींचा आढावा घेणार असल्यामुळे ही परिस्थिती सुधारण्याचा आशेचा किरण दिसत आहे, अशी नागरिकांची भावना आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcommandoकमांडो