शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

आवक घटल्याने जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग घटवला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 18:39 IST

जवळपास १० हजार क्युसेक विसर्ग घटविण्यात आला. 

पैठण : जायकवाडीत येणारी आवक घटत असल्याने धरणातून गोदावरी पात्रात होणारा विसर्ग आज दुपारी ४ वाजेच्या दरम्यान ३५१२५ क्युसेक पर्यंत घटविण्यात आला. गुरुवारी १६ दरवाजातून ४५ हजार क्युसेकपेक्षा जास्त क्षमतेने १६ दरवाजे अडीज फुटाने वर उचलून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत होता. आज अडीच फुटावरून १६ दरवाजे दोन फुटापर्यंत खाली घेऊन जवळपास १० हजार क्युसेक विसर्ग घटविण्यात आला. 

गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावल्याने तेथील धरण समूहातून होणारे विसर्ग आज घटविण्यात आले.यामुळे जायकवाडी कडे येणारी आवक  गुरूवार पेक्षा निम्मी झाली. आवक कमी होत असल्याने जायकवाडीतून होणारा विसर्ग आज दुपारनंतर घटविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून होणारा एकत्रित विसर्ग  नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून  गोदापात्रात होतो तो आज २२३८४ क्युसेक्स पर्यंत  कमी झाला. गुरूवारी जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या नागमठान बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात  ५३२५० क्युसेक विसर्ग मिळत होता तो आज २४८०० ईतका कमी झाला, आवक कमी होत असल्याने जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग आज कमी करण्यात आला.

धरणातून ३६७२५ क्युसेकचा विसर्ग.....१००% भरलेल्या जायकवाडी धरणात ३६७२५ क्युसेक्स क्षमतेने आज आवक सुरू होती तर धरणाचे दोन्ही कालवे, जलविद्युत प्रकल्प व सांडव्यातून मिळून ३६७२५ क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. यामुळे धरणाची १००% पाणीपातळी कायम होती. धरणाचे १६ दरवाजे व जलविद्युत प्रकल्पातून गोदावरी पात्रात ३५१२५ क्युसेकचा विसर्ग  आज सुरू होता तर डावा कालवा ७०० व उजवा कालव्यातून ९०० क्युसेक असे पाणी सोडण्यात आले आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग कमी झाल्याने जायकवाडीतून होणारा विसर्ग कमी करण्यात आला. धरण १००%  भरलेले असेल या दृष्टीने आवक पाहून विसर्ग कमीजास्त करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे व उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी