कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. यामुळे शासनाने ‘सुंदर माझी शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे केळगाव येथील शिक्षकांनी जि. प. शाळेच्या भिंतींवर विविध शिक्षणोपयोगी कलाकृती साकारून शाळेच्या भिंती सुुंदर बनविल्या आहेत. वर्गखोल्यांच्या भिंतींवर रंगरगोटी करून त्यावर मुळाक्षरे, स्वर, व्यंजने काढून विज्ञानाची चित्रे काढत त्यांची माहिती लिहून विविध प्राणी-फुलांची चित्रे, समुद्रातील प्राणी, मासे यांच्यासह विविध झाडे रंगविली आहेत.
यामुळे शाळेचा कायापालट झाला आहे. यासाठी मुख्याध्यापक अय्युब तडवी, शिक्षक कुंभारे, काथार, यादव, खेडकर, पाटील, गजभिये, शिंदे आदींनी सहकार्य केले. ‘सुंदर माझी शाळा’ या उपक्रमासाठी आम्हाला गावकऱ्यांचे योगदान लाभले आहे. सर्व शिक्षकांनीही स्वयंस्फूर्तीने यात सहभाग घेतला. अजूनही चांगले उपक्रम आम्ही राबविणार आहोत, असे मत मुख्याध्यापक अय्युब तडवी यांनी व्यक्त केले.
फोटो कॅप्शन
: केळगाव येथील शैक्षणिक व मनोरंजनात्मक चित्रे, सुविचार रेखाटलेली शाळा.
080721\img-20210708-wa0221_1.jpg
केळगाव येथील शैक्षणिक व मनोरंजनात्मक चित्रे, सुविचार रेखाटलेली शाळा.