शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 19:52 IST

लघुकथा : वसंताच्या या निर्णयाने आबाला धक्काच बसला. एकाएकी आवाज कठोर करत म्हणाले, ‘का रं का दाडगत आली?’ ‘गुढीपाडवा व्हवून आज पंधरादी झालं. पर आवंदा सालगडी म्हणून भेटना’

- प्रदीप धोंडिबा पाटील 

रात्रीचं जेवण झाल्यावर आबा वाड्यासमोरच्या फरसबंदी ओट्यावर आपली घोंगडी अंथरूण बसले. तितक्यात त्यांचा थोरला मुलगा वसंता येऊन काही अंतरावर उभा राहिला. काही वेळ असाच गेला. कोणीच कोणाला काही बोलेना. वसंताला आबांना काही तरी बोलायचे होते. परंतु त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. हिंमत एकवटून हळूच म्हणाला, ‘एक इच्यारायचं  व्हतं’. ‘काय... बोल की’ ‘आवंदा आऊत मोडायचं म्हन्तो’ 

वसंताच्या या निर्णयाने आबाला धक्काच बसला. एकाएकी आवाज कठोर करत म्हणाले, ‘का रं का दाडगत आली?’ ‘गुढीपाडवा व्हवून आज पंधरादी झालं. पर आवंदा सालगडी म्हणून भेटना’

‘घरात बसून सालगडी गावल कसा?’ 

आज पंधरादी झालं फिरून-फिरून पायाला कातोडं -हायलं न्हाई. गावाभोवतालची धा- इस खेडी पालथी घातली. कोणीच हो म्हणीना ‘काय तोडून खाणार हाईत की लेकाचे’

‘खायची चिंताच न्हाई -हायली कुणास. पाच रुपयाला पस्तीस किलो धान्य देतया सरकार घरबसल्या महिन्याला. बिन मोईचं आन् बिन मेहनतीचं’.‘बाकीच्या परपंचासाठी लागतोच की पैसा. तवा तर गरज पडल की’ 

‘पैशाची गरज पडली की मुंबई- पुण्याला पंधरा- ईस दिसासाठी जातात. रात-दिस राबतात. तेवढ्याच दिसात धा- इस हजार घेऊन येतात. अजून संपले की अजून जातात. असाच चालू हाय त्यांचा परपंच. लोकांना मोकळ्या रानी मोकळं ºहाऊन सवय पडली. कशासाठी वर्सभर तुमच्याकडे बांधीव -हातील. वसंताच्या या माहितीनं आबा गपगारच झाले. थोडा वेळ कोणीच काही बोललं न्हाई. पुन्हा आबा म्हणाले, ‘म्हणून आऊत मोडावं म्हणतूस...’ ‘व्हय’‘कुणबीक कशी चालविणार हाईस मंग’‘त्याला परयाय ट्याकटर हायच की’ ‘काय दातं देऊन ट्याकटर घेणार हाईस?’‘बैलबारदाना आन् गाई-वासरं इकून आलेल्या पैशातून येईल की एखादं ट्याकटर’ ‘इतक्या पिढ्यापासून जीव लावून, पोटच्या लेकरागत जीव लावून जगवलेला जनावरांचा बारदाना इकायचं म्हणतूस’‘मंग काय करू... दुसरा परयायच ºहायला न्हाई माज्याकडं?’‘आरं इतकी वर्स बैल बारदाना सांभाळला आमी, त्याचं काईच न्हाई.’ ‘काई कसं न्हाई. तुमच्या कष्टाच्या जोरावर तर आपुन इथवर आलो. पर आबा आता  काळ बदलला..’‘काळ बदलला म्हणून एवढा जीव लावून वाढवलेला बैल बारदाना इकून त्यांची आन् माझी ताटातूट करावं म्हणतोस.’‘त्याची का मला लई हौस हाय का? त्यांच्यात तुमचा जीव किती गुतून हाय हे काय फाईलं न्हाई का म्या आबा’ ‘मंग एकाएकी काळीजच काढून घेयाचा निरणय तू का घ्यावा? त्यांच्या बिगर म्या जगलं वाटते तुला?’ ‘पर ते जगायासाठी त्यांनाबी कुणीतरी चारापाणी करणारं पायजे का न्हाई?  आसं भावनिक होऊन कसं चालल आबा. पैसे मोजायची तयारी ठेवूनबी कोणी -हायला तयार नसल तर दुसरा परयायच शोधावा लागल’ त्यो परयाय सोधून ट्याकटर आनसील रं बाबा, पर माझा जीव बैल बारदान्यात, गाई-वासरात आडकलाय त्याचं काय?’ यावर वसंता पुढं काहीच बोलला नाही. आबाचं ऐकून बैलबारदाना न विकता औताचं काम बघून त्या दिवसापुरता मजुरीचा माणूस घेऊन भागवायचाही वसंतानं विचार करून पाहिला. परंतु गरजेला मजुरीचा माणूस तरी कुठला भेटणार हे ही समस्या होतीच. शेवटी नाईलाजाने काळजावर दगड ठेवून वसंतानं ट्याकटर घ्यायचा निर्णय घेतलाच ...! या निर्णयाने आबा किती नाराज होतील की वाटले; परंतु तसं काही घडलं नाही. दारातलं ट्याकटर बघून आबा म्हणाले, ‘वसंता, माझंच चुकलं. तुझा निर्णय बेस झाला. माणसानं येवारात भावनिक व्हवून चालत न्हाई. काळा परमाणं बदलावं लागतं. न्हाईतर उपाशी मरावं लागल’.( patilpradeep495@gmail.com )

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा