शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत काढण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अवैध, जनहित याचिका सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 13:00 IST

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे.

ठळक मुद्दे१५ डिसेंबर रोजी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करणाऱ्या सर्व सोडती रद्द सर्वच ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय

औरंगाबाद : निवडणुकीनंतर सरपंच पदाची सोडत काढण्याचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली आहे. याचिकेवर ७ जानेवारीला प्राथमिक सुनावणी होणार आहे.

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी, या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी आवश्यक त्या प्रवर्गांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातल्या अनेक ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण काढणाऱ्या सोडतीदेखील घेण्यात आल्या होत्या. मात्र, ग्रामविकास मंत्र्यांनी १५ डिसेंबर रोजी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करणाऱ्या सर्व सोडती रद्द करीत सर्वच ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय जाहीर केला व १६ डिसेंबर रोजी ग्रामविकास विभागाने तसा आदेशही जारी केला आहे.

गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथील अ‍ॅड. विक्रम गोकुळराव परभणे यांनी या निर्णयाच्या घटनात्मकतेला आव्हान देणारी जनहित याचिका अ‍ॅड. देविदास शेळके यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात सादर केली आहे. याचिकेनुसार निवडणुकीनंतर सोडत काढल्याने संबंधित गावातील संबंधित मागास समुदायाऐवजी केवळ निवडून आलेल्या उमेदवारासाठीच सदरचे पद आरक्षित होईल. यामुळे घटनेच्या अनुच्छेद १४ चा भंग होत असून एकूण आरक्षण धोरणाचा हेतूच मोडीत निघत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच यामुळे अनुच्छेद २४३ (ड) चा भंग होत असल्याचे देखील म्हटले आहे.

सदस्य पदासाठी अगोदरच आरक्षण जाहीर झाले आहे. सदस्य पदासाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना देखील अगोदरच जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यामुळे सरपंच पदाची सोडत निवडणुकीनंतर घेण्यासाठी दिलेल्या सर्व सबबी सदस्य पदासाठीच्या आरक्षणासाठी देखील लागू पडतात. सदरचा निर्णय घटनाबाह्य म्हणून घोषित करावा व १० डिसेंबरपूर्वी घेतलेल्या सोडतीमधील आरक्षण कायम करून उर्वरित ग्रामपंचायतींसाठीची सोडतदेखील निवडणुकांपूर्वीच घ्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठsarpanchसरपंचElectionनिवडणूक