शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सामायिक घरावर परस्पर उचलले १ कोटी २० लाखाचे कर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:44 IST

सामायिक घर एकट्याचेच असल्याचे खोटे दस्त सिडको आणि बँकेला सादर करून १ कोटी २० लाख रुपयांचे परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एका उद्योजकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

औरंगाबाद : सामायिक घर एकट्याचेच असल्याचे खोटे दस्त सिडको आणि बँकेला सादर करून १ कोटी २० लाख रुपयांचे परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एका उद्योजकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

संदीप साहेबराव आग्रे (रा. टाऊन सेंटर, सिडको) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सिडको पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार लक्ष्मण परभतराव घुगे (६८, रा. टाऊन सेंटर, सिडको) यांनी आणि आरोेपीच्या वडिलांनी मिळून १९९२ साली सिडकोतील टाऊन सेंटर येथील २ हजार ८०० चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता. भूखंडाचे क्षेत्रफळ तीन हजार चौरस फुटांपेक्षा कमी असल्याने सिडकोने या भूखंडाची वाटणी करून दिली नव्हती. परिणामी, दोघांच्या नावे असलेल्या या भूखंडावर घुगे आणि आग्रे यांच्या वडिलांनी एकत्रित घराचे बांधकाम केले. काही वर्षांनंतर आरोपीचे वडील मृत झाले. ३० डिसेंबर २००९ ते २५ मे २०१६ या कालावधीत आरोपी संदीप यांनी क्रांतीचौकातील एका बँकेकडे घर तारण ठेवून १ कोटी २० लाख रुपये कर्ज घेतले. ही बाब तक्रारदार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. 

या तक्रारीत म्हटले की, आरोपीने कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रात तक्रारदार यांच्या परस्पर त्यांच्या बनावट सह्या करून खोटी कागदपत्रे सिडको कार्यालय आणि बँकेत सादर केले. तसेच सामायिक घराची मूळ कागदपत्रे तक्रारदार यांच्या परस्पर बँकेत गहाण ठेवून परस्पर १ कोटी २० लाख रुपये कर्ज घेतले. घुगे हे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी तर आग्रे हे उद्योजक आहेत.याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलीस उपनिरीक्षक सी.बी. ठुबे यांच्याकडे तपास देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी दिली. 

कागदपत्रातील सह्यांची केली पडताळणी या गुन्ह्याविषयी माहिती देताना पोलीस निरीक्षक प्रजापती म्हणाले की, तक्रारीनुसार गुरुवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीच्या म्हणण्यानुसार बँकेने त्यांच्या स्वत:च्या घराचे मूल्यांकन दीड कोटी दाखविले होते. त्याआधारेच बँकेने आपल्याला कर्ज दिले. सामुदायिक बांधकाम झालेले असले तरी आम्ही आमच्याच वाट्याच्या घरावर कर्ज घेतले आहे. आरोपीने दोघांच्या संपूर्ण घरावर कर्ज घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केला. कर्जसंबंधी बँकेकडील कागदपत्रे आणि सिडकोला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रातील सह्यांची पडताळणी केली जाईल, नंतरच या प्रकरणातील सत्यता समोर येईल.

टॅग्स :MONEYपैसाbankबँकcidco aurangabadसिडको औरंगाबादAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस