कुडाळ : गोवा येथे पर्यटनाचा आनंद लुटून औरंगाबादला परतणाऱ्या अमोल साहेबराव चव्हाण (वय २४, रा. भिवधाणोरा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) या युवकाचा कुडाळ येथे मृत्यू झाला. सुटीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अमोल चव्हाण हा आपल्या आठ मित्रांसोबत गोवा येथे चार ते पाच दिवसांपूर्वी पर्यटनासाठी आला होता. तेथून मंगळवारी परतताना साळगाव-कुडाळ येथे एका हॉटेलात ते सर्वजण जेवणासाठी थांबले होते. जेवण झाल्यानंतर अमोलची तब्येत अचानक बिघडली आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला तत्काळ कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अमोल हा स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता होता. दरम्यान, कुडाळचे सरपंच विनायक राणे यांनी रुग्णालयात जाऊन त्याच्या मित्रांचे सांत्वन केले. (प्रतिनिधी)
औरंगाबाद येथील पर्यटकाचा मृत्यू
By admin | Updated: November 4, 2014 22:45 IST