शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पुत्रवियोगाच्या धक्क्याने माता-पित्याचाही मृत्यू; डॉ.संजय नवले यांच्या आई-वडिलांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 12:17 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ.संजय माणिकराव नवले (वय ५५) यांचे १५ एप्रिल रोजी उपचार सुरु असतांना औरंगाबादेत निधन झाले.

ठळक मुद्देअंत्यसंस्कारास उपस्थित असलेल्या वयोवृद्ध आई-वडिलांना लाडक्या मुलाच्या मृत्यूने मोठा धक्का बसला. अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांना पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच दोघांचा मृत्यू झाला

औरंगाबाद : कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत दिवंगत प्राध्यापक संजय नवले यांचे वडील माणिकराव ( माजी शिक्षण अधिकारी, ८०)  व आई मंदाकिनी ( ७८) हे मृत्यू पावले आहेत. दोघांचा मृत्यू शुक्रवारी सायंकाळी पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना झाला. त्यांच्यावर आज सकाळी धनकवडी, पुणे येथील महानगरपालिकेच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 घटनेची अधिक माहिती अशी की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ.संजय माणिकराव नवले (वय ५५) यांचे १५ एप्रिल रोजी उपचार सुरु असतांना औरंगाबादेत निधन झाले. मुळचे चोराखळी (ता.कळंब, जि.उस्मानाबाद) येथील ते रहिवाशी होते. त्यांच्यावर त्याच दिवशी ऊस्मानाबादेत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारास उपस्थित असलेल्या वयोवृद्ध आई-वडिलांना लाडक्या मुलाच्या मृत्यूने मोठा धक्का बसला. अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांना पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच माणिकराव तात्याबा नवले ( माजी शिक्षण अधिकारी, ८०) यांचे शुक्रवारी (दि.२३) सायकांळी ५ वाजता निधन झाले. तर दोन तासातच पत्नी मंदाकिनी माणिकराव नवले ( ७८) यांनीही प्राण सोडला. पुत्रवियोगाचा धक्का बसल्याने अंथरुणाला खिळलेल्या या दोघांचीही प्राणज्योत मालवली. या दांपत्यावर आज सकाळी धनकवडी, पुणे येथील महानगरपालिकेच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात प्रा.अरविंद (शिवाजी महाविद्यालय, उदगीर) व सुनील (पुणे) ही दोन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचे वृत्त समजताच चोराखळी गावावर शोककळा पसरली आहे. 

दरम्यान, डॉ.संजय नवले यांच्या पाठोपाठ आई- वडिलांचेही निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आम्ही सर्वजण या दुःखात सहभागी आहोत, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी नवले कुटुंबियास पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबाद