शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

घराला लागलेल्या आगीत बालकाचा मृत्यू ,अन्य सात जणही होरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:59 IST

: येथून जवळच असलेल्या शेवगा (ता. औरंगाबाद) येथील एका घराला शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कुटुंब होरपळले. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या सोळा महिन्यांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी सकाळी मृत्यू झाला. भाजलेल्या अन्य ७ जणांवर उपचार सुरू आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद तालुक्यातील शेवगा येथील घटना : भाजलेल्या कुटुंबावर घाटी रुग्णालयात उपचार, चिमुकल्याची बारा तास मृत्यूशी झुंज व्यर्थ

करमाड : येथून जवळच असलेल्या शेवगा (ता. औरंगाबाद) येथील एका घराला शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कुटुंब होरपळले. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या सोळा महिन्यांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी सकाळी मृत्यू झाला. भाजलेल्या अन्य ७ जणांवर उपचार सुरू आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.नूर मोहम्मद जावेद बेग असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. महेक जावेद बेग (वय ८), यास्मीन राजू बेग (२८), अनिस राजू बेग (१२), अरमान राजू बेग (१०), सुहाना इलियास बेग (९), सुरय्या इलियास बेग (३२) अशी जळालेल्यांची नावे आहेत. जावेद वाहेद बेग हे शेतकरी असून, ते शेवग्यात पानटपरीचा व्यवसाय करतात. पत्र्याच्या तीन खोल्यांच्या घरात पत्नी, मुलगा आणि मुलींसह राहतात. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्राच्या घरातील बैठक खोलीत अचानक शॉर्टसर्किटमुळे स्पार्किंग झाल्याने तेथील प्लास्टिक चटईसह कपड्याने पेट घेतला. तेव्हा जावेद हे दुकानात होते. आग लागल्याने गावातील लोकांनी वीज वितरण कंपनीला फोन करून वीजपुरवठा बंद केला. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यावेळी जावेद यांच्या कुटुंबियासह भावाची पत्नी आणि लहान मुलेही घरात होते. आग लागताच समोरच्या खोलीतील काही जण घाईगडबडीत बाहेर पळाले; परंतु पळताना ते होरपळले. मधल्या खोलीतील जकिराबी जावेद बेग (वय ३०) यांना चिमुकल्या नूरसह आगीतून बाहेर पडता येईना. त्या कशाबशा बाहेर पळाल्या; परंतु त्यांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने माय-लेक गंभीररीत्या भाजले. लोकांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले. होरपळलेल्या सर्वांना तातडीने घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले.चौकटचिमुकल्या नूरची मृत्यूशी बारा तास झुंजआगीत गंभीररीत्या जळालेल्या चिमुकल्या नूरने घाटीत बारा तास मृत्यूशी झुंज दिली. शनिवारी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास मृत्यूने त्याला गाठले. नूर त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मातेची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांकडून समजले.----संसारोपयोगी साहित्य जळून खाकया आगीमुळे जावेद बेग यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि १५ हजार रुपये जळून खाक झाले. करमाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. तपास पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर, उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, जमादार रमेश धस करीत आहेत.

टॅग्स :fireआगAccidentअपघात