शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयातील डीन बंगल्याचे दार १५ वर्षांनंतर उघडणार; अधिष्ठातांचा राहण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 14:17 IST

घाटी रूग्णालयाच्या डीनचा परिसरातच राहण्याचा निर्णय

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) डीन बंगल्यात गेल्या १५ वर्षांत कोणतेही अधिष्ठाता राहिलेले नाही. त्यामुळे बंगल्याची दुरवस्था झाली आहे. काही खोल्या सध्या कार्यालयीन कामकाजासाठी वापरल्या जात आहेत. मात्र, नवनियुक्त अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांनी डीन बंगल्यात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

नियमानुसार, शासकीय वैद्यकीय व रुग्णालयातील अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी व इतरांनी कॅम्पसमध्ये राहणे बंधनकारक असताना, मागील १५ वर्षांपासून घाटीचे अधिष्ठाताच कॅम्पसमध्ये राहत नाहीत. डॉ. निमाले हे घाटीच्या डीन बंगल्यामध्ये राहणारे शेवटचे अधिष्ठाता होते. त्यांच्यानंतर घाटी रुग्णालयाच्या कॅम्पसमध्ये एकही अधिष्ठाता राहिलेले नाहीत.

अधिष्ठातापदी रुजू झाल्यानंतर डाॅ. संजय राठोड यांनी डीन बंगल्याची पाहणी केली. या ठिकाणी काही खोल्यांमध्ये सध्या पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना यांचे मदत केंद्र आहे. हे केंद्र इतरत्र स्थलांतरित करून डीन बंगल्याची दुरुस्ती केली जाणार आहे.

रुग्णसेवेवर राहणार वचकसध्या सायंकाळनंतर संपूर्ण अपघात विभाग केवळ निवासी डॉक्टरांच्या भरवशावर राहतो. रात्री कधीतरी सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक किंवा विभागप्रमुख राहत असल्याची परिस्थिती आहे. रात्री विभागप्रमुख, सहयोगी प्राध्यापक किंवा सहायक प्राध्यापकांनी अपघात विभागात असणे बंधनकारक नाही, असा युक्तिवाद केला जातो. रात्री काही घटना घडल्यानंतर वरिष्ठांना धावत घाटी गाठावी लागते. परंतु, आता अधिष्ठाताच घाटी परिसरात राहणार असल्याने रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टर