शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

देवळाई रोडवर धाडसी चोरी; सुरक्षारक्षकाला गुप्तीचा धाक दाखवून फोडले शिक्षक दांपत्याचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 16:57 IST

सोसायटीच्या मागील वॉल कंपाउंडवरुन उड्या घेऊन पाच जण घुसले

ठळक मुद्देदीड लाखाचा ऐवज लंपास 

औरंगाबाद:  देवळाई रोडवरील मनजीत प्राईड ग्लोरी या वसाहतीच्या वॉचमनला गुप्तीचा धाक दाखवून पाच चोरट्यानी शिक्षक दांपत्याचा फ्लॅट फोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केले. ही धाडसी चोरी सोमवारी रात्री दोन ते अडिच वाजेच्या सुमारास झाली. घटनेची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

प्राप्त माहिती अशी की , मनजीत प्राईड सोसायटीतील रहिवासी राजेंद्र रविंद्र बसवे आणि योगिता बसवे हे दांपत्य शिक्षक आहे. सोसायटीच्या सुरक्षेसाठी चोहोबाजूंनी वॉल कंपाउंड आणि जाळी लावली आहे. मुख्य गेटमधून सर्वाना प्रवेश असतो. या गेटवर २४ तांस सुरक्षारक्षक बसलेला असतो. शिवाय एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत रहिवास्याने त्याच्या कारच्या सुरक्षेसाठी राऊत नावाचा स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमलेला आहे . बसवे यांची १८ वर्षीय  मुलगी नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या नातेवाईकांकडे गेली होती. तिला आणण्यासाठी आणि नातेवाईकांचा भेटण्यासाठी बसवे दांपत्य सोमवारी दुपारी फ्लॅटला कुलूप लावून नंदनवन कॉलनीत गेले होते. सोमवारी रात्री २ ते २:३०  वाजेच्या सुमारास सोसायटीच्या मागील वॉल कंपाउंडवरुन उड्या घेऊन पाच जण घुसल्याचे वॉचमन राऊत यांनी पाहिले. यानंतर ते तेथून मुख्य गेटवरील  सुरक्षारक्षक समुद्रेवार यांना ही बाब सांगितली. 

यानंतर राऊत त्याच्या मालकाच्या कारजवळ जाऊन बसला. तर समुद्रेवार सोसायटीच्या मागील बाजूला गेले. असता टेहळणी करणाऱ्या दोन चोरट्यानी त्यांना गुप्तीचा धाक दाखविला आणि शांत बसा नाहीतर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या समुद्रेवार हे तेथेच बसले. काही वेळाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील तीन चोरटे बसवे यांचे फ्लॅट फोडून किमती ऐवज चोरी करून खाली आले. यानंतर सर्व चोरटे एकत्रित आल्यामार्गाने पसार झाले. या घटनेनंतर समुद्रेवार यांनी आरडाओरड करीत रहिवाशांना बोलावले . तेव्हा चोरट्यानी बसवे दांपत्याचे घर फोडल्याचे समजले. बसवे यांचा भाऊ त्यांच्या फ्लॅटच्या वरच्या मजल्यांवर राहतो. त्यांनी आणि रहिवाश्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. रात्रपाळीच्या  गस्तीवरील सातारा पोलीस आणि गुन्हेशाखेचे सहायक  पोलीस निरिक्षक अजबसिंग जारवाल , शिवाजी झिने , प्रकाश चव्हाण, राजेंद्र साळुंके यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चोरांचा शोध घेतला मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही.

दीड लाखाचा ऐवज लंपास राजेंद्र रवींद्र बसवे यांनी  घरी येऊन पाहणी केली. चोरट्यानी  फ्लॅटचा दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला. कपाटातील  सोन्याचे तीन जोडी कानातील,  नथ, मंगळसूत्र पेंडल आणि  सुमारे 25 ते 30  हजार रोख असा एकूण दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याचे दिसले. यानंतर त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली.

टॅग्स :RobberyचोरीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी