शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'दानवे शेतकऱ्यांची माफी मागा'; प्रहार संघटनेचे जलकुंभावर आंदोलन, आत्मदहनाचा दिला इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 17:19 IST

रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून माफी मागावी

ठळक मुद्देसंध्याकाळपर्यंत माफी मागतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा

औरंगाबाद : शेतकरी आंदोनलामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी केला होता. दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी प्रहार संघटनेनेचे शिवाजी नगर येथील जलकुंभावर चढून आंदोलन सुरु आहे. संध्याकाळपर्यंत माफी मागितली नाहीतर आत्मदहन करण्याचा आंदोलकांनी दिला आहे.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जालना येथे धक्कादायक विधान केलं आहे. "शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन नाही", असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं होते. यानंतर त्यांच्याविरोधात शेतकरी आणि राजकीय स्तरातून टीका सुरु झाली असून त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी होत आहे. गुरुवारी दुपारी प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील शिवाजीनगर जलकुंभावर चढून आंदोलन केले. शेतकरी विरोधी विधानाचा निषेध करून आंदोलकांनी दानवे यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी केली आहे. संध्याकाळपर्यंत माफी मागतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दिल्लीत सुरू असलेले आंदोलन सुटाबुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे अशी भूमिका दानवे यांनी मांडली होती. तसेच "आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचकलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?", असं शेतकरी आंदोलनावरुन विधान करून दानवे यांनी आता नव्या वादाला तोंड फोडले आहे. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन