शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

नारेगावात कचरापट्टीआड सुरु आहेत धोकादायक उद्योग; दोन वर्षांत आगीच्या ५ घटना घडल्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 18:24 IST

नारेगाव कचरा डेपोच्या रस्त्यावर विनापरवाना धोकादायक गोदाम व उद्योग सुरू आहेत.

ठळक मुद्दे नागरिकांच्या जीवितास धोकापोलीस देणार नोटीस

औरंगाबाद : नारेगाव कचरा डेपोच्या रस्त्यावर विनापरवाना धोकादायक गोदाम व उद्योग सुरू आहेत. त्यांच्याकडे अग्निशामक विभागाचेही नाहरकत प्रमाणपत्र नाही, सुरक्षेची कोणतेही साधने नाहीत. दोन वर्षांत आगीच्या ५ गंभीर घटना घडल्या आहेत, त्यामुळे आता खबरदारी म्हणून पोलीस सर्वांना नोटिसा बजावणार आहेत.

कचरा डेपो हटविण्यासाठी परिसरातील नागरिकांना प्रचंड संघर्ष करावा लागला. आता परिसरात केवळ ६०० चौरस फुटांच्या जागेवर पत्र्यांचे शेड उभे करून कारखाने उभे केलेले आहेत. त्यासाठी गरजेचा किमान शॉप अ‍ॅक्टचा परवाना आहे काय? किती दुकाने, गोदामे तसेच लघु उद्योग सुरू आहेत, त्यांच्याकडे औद्योगिक महामंडळ, कामगार उपायुक्त कार्यालय, मनपाकडून रीतसर परवाने आहेत किंवा नाही, हे तपासण्यासाठी एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे नोटिसा पाठविणार आहे. ज्या ठिकाणी आगी लागल्या त्या आगी निवासी वसाहतीलगतच होत्या. या गोदामाला निवासी वसाहतीत परवानी देण्यासाठी लागणारे निकष कोणीही पाळलेले दिसत नाहीत.

नारेगाव परिसरात फोमच्या गोदामाला सोमवारी लागलेल्या आगीत आणखी दोन दुकाने भक्ष्यस्थानी पडली. एका दुकानाची आग विझविल्यानंतर दुसऱ्या दुकानाने पेट घेतला. आगीसोबत ४ तासांचा संघर्ष अग्निशामक विभागाला करावा लागला. नुकसान वगळता जीवित हानी टळली.

नियम धाब्यावरदुकान, गोदाम किंवा वर्कशॉप असल्यास त्याचे काही निमय पाळणे गरजेचे असून, त्यानंतरच तुम्हाला उद्योग व व्यवसाय सुरू करता येतो. खाद्यान्नाचे दुकान असले तरी शॉप अ‍ॅक्ट आणि अन्न औषधी विभागाचा परवाना घेणे आवश्यक आहे. त्यापैकी परवाना घेण्याकडे कुणाचा कल दिसत नाही, फक्त पत्र्याचे शेड उभे करून दुकान सुरू केले जाते. सुरक्षेसाठी कुणाकडेही आग विझविण्याचे यंत्र नाही. ते दुकानात ठेवणे अनिवार्य आहे. 

मनपा अधिकाऱ्यांनी सर्व्हे करावानारेगाव परिसरातील पूर्वेला कचरा डेपोपर्यंत नागरी वसाहत वाढली असून, गल्ली गल्लीत व्यावसायिकांची दुकाने तसेच गोदामे उभी आहेत. घरांना कर लावण्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तर व्यावसायिकांनी सुरू केलेल्या व्यवसायाची माहिती काढून सांगता येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

परवानगी तपासणारनागरी वसाहतीत धोकादायक कारखाने कोणत्या नियमाने सुरू झाली व त्यांच्याकडील कागदपत्रे तपासण्यासाठी नोटीस पोलीस ठाण्यामार्फत पाठविणार आहे. - सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नNaregaon Garbage Depoनारेगाव कचरा डेपो