शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

डान्स टीचरला गांजा विकताना पकडले, उस्मानुपऱ्यातील मनपा शाळेजवळ कारवाई

By राम शिनगारे | Updated: February 24, 2023 21:12 IST

उस्मानपुरा भागात सर्वाधिक दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेण्यात येतात.

औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांना नृत्य शिकणाऱ्या एका शिक्षकासह त्याच्या साथीदाराला उस्मानपुऱ्यातील सीबीएसई मनपा शाळेजवळ गांजाची विक्री करताना उस्मानुपरा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या दोघांकडून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली.करण डेव्हिड ॲंथोनी बिजीरा (२७) व आदित्य प्रदीप पंडीत (२५, दोघे रा. भावसिंगपुरा) अशी आरोपीची नावे आहेत. यातील करण डेव्हिड हा विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नृत्य शिकवतो. त्याची आई सुद्धा शिक्षीका आहेत. तर दुसरा आरोपी क्रुझवर कामाला आहे. निरीक्षक बागवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार करण डेव्हिड हा किरकोळ गांजाची विक्री करण्यासाठी सहकाऱ्यासह मनपाच्या शाळेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उस्मानुपरा पोलिसांनी सापळा लावला. गांजा विक्रीसाठी आलेले आरोपी दिसताच त्यांची थांबवून झाडाझडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे गांजा आढळून आला. या दोघांकडून गांजासह ४० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अंमलदार विलास कराळे यांच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.उस्मानपुरा भागात सर्वाधिक क्लासेस

उस्मानपुरा भागात सर्वाधिक दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग घेण्यात येतात. या शिकवणी वर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नशेमध्ये ओढले जाऊ शकते. त्यामुळे उस्मानपुरा पोलिस याविरोधात अधिक जागरुकतेने कार्यवाही करीत आहेत. अमली पदर्थाविषयी काेणाला काही संशय आल्यास उस्मानपुरा पोलिसांनी कळवावे, असे आवाहनही निरीक्षक गिता बागवडे यांनी केले.

नारेगावात एनडीपीएस पथकाची कारवाईनारेगाव परिसरातील जोशी आळी भागात राहणार्या काकासाहेब रंभाजी महापुरे यांच्या घरावर एनडीपीएसच्या पोलिसांनी २२ फेब्रुवारी रोजी रात्री छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी ६ हजार ८८० रूपये किंमतीचा ३४४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद