शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

प्रत्येक पोलिस ठाण्यात दामिनी पथक स्थापन करणार

By admin | Updated: December 8, 2015 00:03 IST

भोकरदन : महिला सुरक्षा व महाविद्यालयीन परिसरात होणाऱ्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात दामिनी पथकाची स्थापना करण्यात येणार

भोकरदन : महिला सुरक्षा व महाविद्यालयीन परिसरात होणाऱ्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात दामिनी पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांनी भोकरदन येथे जनतेशी संवाद साधताना दिली.उपविभागीय कार्यालय व भोकरदन पोलिस ठाण्याच्या तपासणीसाठी विश्वास नांगरे हे भोकरदन शहरात आले होते. यावेळी त्यांनी उपविभागातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीबाबत माहिती घेऊन गुन्हेगाराविरूध्द कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. भोकरदन पोलिस ठाण्यामध्ये नागरिक व पत्रकारांशी संवाद साधताना नागरिकांच्या तसेच महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन त्याची तात्काळ दखल घेतली. यावेळी महिलांनी छेडछाड, रोडरोमिओ, अवैध दारू, गुटखा याबाबत माहिती दिली असता त्यानी सर्व पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. ठाण्याच्या परिसरात दामिनी पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांना दिल्या़ त्याच प्रमाणे अनेक तरूण नशा म्हणून केमिकल व औषधींचा वापर करीत आहेत. त्याची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या़ तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे नांगरे म्हणाले. यावेळी पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलिस अधिकारी इश्वर वसावे, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस निरीक्षक योगीराज शेवगण, जाफराबादचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, वाचक पोलिस निरिक्षक शिनगारे, पारधचे सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण बिडवे, हासनाबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार, टेंभूर्णीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निंभोरे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, पत्रकार, पोलिसमित्र, महिला, व्यापारी तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ (वार्ताहर)