शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

डीएमआयसीत इलेक्ट्रॉनिक, आॅटोमोबाईल्सशी निगडित अँकर प्रोजेक्टची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:38 IST

आॅरिकमध्ये इलेक्ट्रॉनिक अथवा आॅटोमोबाईल्स क्षेत्राशी निगडित मोठ्या अँकर प्रोजेक्टची गरज असल्याचे मत लघु उद्योजक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा, पैठण, चित्तेगाव, रेल्वेस्टेशननंतर आॅरिक सिटी आणि बिडकीन इंडस्ट्रीयल पार्कमध्ये पायाभूत सुविधांचे काम दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत सुरू आहे. आॅरिकमध्ये इलेक्ट्रॉनिक अथवा आॅटोमोबाईल्स क्षेत्राशी निगडित मोठ्या अँकर प्रोजेक्टची गरज असल्याचे मत लघु उद्योजक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

२०१६ मध्ये किया मोटार्सने डीएमआयसीला हुलकावणी दिल्यानंतर मे २०१८ मध्ये जीएसडब्ल्यू या आॅटोमोबाईल्स क्षेत्रातील बड्या उद्योगानेही शेंद्रा-आॅरिक सिटीऐवजी पुण्यात गुंतवणुकीला पसंती दिली. महिंद्रा, फोक्सवॅगन, नेस्ले, हीरो, होंडा, फोर्ड, मारुती सुझुकीनंतर किया मोटार्सदेखील येणार येणार म्हणून चर्चाच झाली. या कंपन्यांची गुंतवणूक होणार असल्याबाबत बातम्याच आजवर येत राहिल्या; परंतु हे उद्योग दुसरीकडेच गुंतवणुकीसाठी सरसावले. गेल्या वर्षी जीएसडब्ल्यू या कंपनीची चर्चा झाली.

त्या कंपनीने पुण्यामध्ये गुंतवणुकीचा विचार केला. किया मोटार्स, एलजी, एसएआयसीने हुलकावणी दिल्यानंतर आॅरिकमध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक, आॅटो उद्योगाची प्रतीक्षा लागलेली आहे. शेंद्रा आणि बिडकीनमध्ये सुमारे १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. आॅरिकमध्ये उद्योग भेटी देत असल्याचे फक्त दावे होत आहेत. ह्योसंगनंतर कुठल्याही मोठ्या उद्योगाने डीएमआयसीच्या गुंतवणुकीसाठी विचारणा केली नसल्याचे वृत्त आहे.

लघु उद्योग संघटनेचे मत असे--

ह्योसंग हा मोठा उद्योग आॅरिक सिटीमध्ये आला; परंतु तो वस्त्रोद्योगाशी निगडित उद्योग असल्यामुळे तो अँकर प्रोजेक्ट ठरू शकत नाही. येथील लघु उद्योगांची साखळी आॅटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सशी निगडित आहे. त्यामुळे याच क्षेत्राचा मोठा अँकर प्रोजेक्ट जर आॅरिकमध्ये आला तरच लघु उद्योगांच्या साखळीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. किया मोटार्सनंतर जीएसडब्ल्यूच्या ८ हजार कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा होती; परंतु ती कंपनी आली नाही, असे मत मसिआचे अध्यक्ष किशोर राठी यांनी व्यक्त केले.सरकारी गुंतवणुकीची कोटीच्या कोटी उड्डाणेशासनाने आॅरिक-डीएमआयसीच्या भूसंपादनासाठी ३ हजार कोटी रुपये गुंतविले आहेत. आॅरिक सिटीच्या प्रशासकीय हॉल व इतर सुविधांच्या विकासाची कामे गतीने सुरू आहेत. बिडकीनच्या पहिल्या टप्प्यातील १३९० कोटींचे टेंडर अंतिम करून काम वेगाने सुरू केले आहे. शेंद्रा डीएमआयसीतील प्रशासकीय इमारतीची डिसेंबर २०१८ ची डेडलाईन हुकली आहे. पहिला टप्पा २०२० पर्यंत, दुसरा टप्पा २०२१ पर्यंत तर तिसरा टप्पा २०२२ पर्यंत होईल. ४५ मीटर रोड याअंतर्गत विकसित होईल. त्यात ड्रेनेज, विद्युत, साईड ड्रेन, भारतात प्रथमच रस्त्याच्या मधोमध इलेक्ट्रिकल स्ट्रेंच वापरण्यात येणार आहेत. शेंद्रा ते बिडकीन असा एनएचएआय रोड विकसित करणार आहे. शेंद्रा-बिडकीन इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी ७ हजार ९४७ कोटींची तरतूद बजेटमध्ये झालेली आहे. हे सगळे असताना मोठा उद्योग या परिसरात का येत नाही, असा प्रश्न आहे. 

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबाद