शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नंबर प्लेटवर दिसणारे ‘दादा’, ‘भाऊ’ ‘नाना’ होणार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:57 IST

१ एप्रिलनंतर उत्पादित वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक

ठळक मुद्देवाहनाच्या किमतीतच नंबर प्लेटचा खर्च समाविष्ट१ एप्रिलनंतर उत्पादित वाहनांवर हा नियम राहणार आहे.

औरंगाबाद : शासनाने १ एप्रिलनंतर उत्पादित वाहनांना आता हायसिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय लागू केला आहे. वाहन उत्पादकांकडून ही नंबर प्लेट देण्यात येणार आहे. वाहनाच्या किमतीतच त्याचा खर्च समाविष्ट राहणार असून, ग्राहकांना त्यासाठी वाहन वितरकांना वेगळी रक्कम द्यावी लागणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून या नंबर प्लेट लावण्यात येणार होत्या; परंतु हायसिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय रेंगाळत राहिला. यावर्षी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने हायसिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले; परंतु १ एप्रिलनंतर उत्पादित वाहनांवर हा नियम राहणार आहे. या नंबर प्लेटसाठी वेगळे कोणतेही शुल्क आकारू नये, असा निर्णयही घेण्यात आला आहे. हायसिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याची जबाबदारी ही संबंधित वाहन उत्पादक कंपन्यांवर सोपविण्यात आली आहे.

१ एप्रिलनंतर उत्पादित वाहनांची आवक आगामी १५ ते ३० दिवसांत होण्याची शक्यता आहे. संबंधित कंपनीकडून या नंबर प्लेटसाठी वेंडर नेमण्यात येणार आहेत. वाहन खरेदीनंतर आरटीओ कारवाई पूर्ण केल्याच्या तीन दिवसांनंतर ही हायसिक्युरिटी नंबर प्लेट मिळणार असल्याची माहिती वाहन वितरकांकडून देण्यात आली आहे.

हायसिक्युरिटी नंबर प्लेटचा वाहनधारकांना फायदा काय ? हायसिक्युरिटी नंबर प्लेटमध्ये विशेष चिप असणार आहे. या चिपमध्ये वाहनांच्या संबंधित माहिती दिली जाणार आहे. परिवहन विभागामध्ये वाहनांची नोंदणी केल्यानंतर ती माहितीही त्या चिपमध्ये राहील. या प्लेटचा पूर्ण पॅनल राहणार आहे. प्लेट बदलण्यासाठी पूर्ण पॅनल बदलावा लागणार आहे. त्यामुळे वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. शिवाय नंबर पडल्याशिवाय नवे वाहन रस्त्यावर आणता येणार नाही. याबरोबर नंबर प्लेटवर दिसणारे ‘दादा’, ‘भाऊ’ ‘नाना’  हद्दपार होतील.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसdigitalडिजिटलAurangabadऔरंगाबाद