शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

वाळूज महानगरात घरपोच सिलिंडर मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:34 PM

वाळूज महानगर: ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र तरीही वाळूज महानगरात बहुतांशी एजन्सी चालकांकडून एजन्सीसमोर किंवा ...

वाळूज महानगर: ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र तरीही वाळूज महानगरात बहुतांशी एजन्सी चालकांकडून एजन्सीसमोर किंवा रस्त्यावरच ग्राहकांना सिलिंडरचे वाटप केले जात आहे. एजन्सी चालकाच्या मनमानीमुळे ग्राहकांना सिलिंडरची स्वत:च धोकादायकरित्या ने-आण करावी लागत असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे पुरवठा विभाग मात्र डोळेझाक करित असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

वाळूज महानगरात घरपोच गॅस सिलिंडर सेवा पुरती कोलमडली आहे. गॅस एजन्सी चालकाकडून बहुतांशी ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडरचे वाटप न करता पैशाची बचत करण्यासाठी एजन्सीसमोर किंवा एखाद्या चौकात उभे रहावून भर रस्त्यावरच सिलिंडरचे वाटप केले जात आहे. मात्र गरजेपोटी ग्राहकांना नाईलाजाने हा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर सिलिंडर वाटप केले जात असल्याने ग्राहकांना दुचाकी, सायकल तसेच डोक्यावर धोकादायकरित्या सिलिंडरची ने-आण करावी लागत आहे. ग्राहकांना नोंदणी केल्यानंतर साधारणत: एका आठवड्यात सिलिंडर घरपोच मिळणे आवश्यक आहे. परंतू तसे होताना दिसत नाही. बऱ्याचदा नोंदणी करूनही दोन-दोन आठवडे सिलिंडर मिळत नसल्याची ग्राहकांची ओरड आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून स्टोव्ह, विजेवर चालणारी शेगडी आदीचा वापर केला जातो. मात्र सततची लोडशिडिंग व केरासीनचा तुटवडा यामुळे पर्यायी व्यवस्थाही कुचकामी ठरत आहे. त्यामुळे सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहकांना काम बुडवून सारख्या चकरा माराव्या लागत आहेत. एजन्सीचालकाच्या मनमानी कारभाराला ग्राहक वैतागले आहेत. यातून बºयाचदा ग्राहक व एजन्सी कर्मचारी यांच्यात वादाच्या घटना घडत आहेत. मात्र याकडे पुरवठा विभाग सोयीस्कररित्या डोळेझाक करित असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ग्राहकांची लूट ..बºयाचदा मिळालेल्या सिलिंडरमध्ये रेग्युलेटर न बसणे, गॅस लिकीज होणे आदी अडचणी येतात. या संदर्भात ग्राहकांनी तक्रारी केल्यास त्या जाणीवपूर्वक टाळल्या जातात. या तक्रारी विनाशुल्क सोडविणे आवश्यक असतानाही यासाठी वेगळे शुल्क आकारले जातात. त्याचबरोबरच येण्या-जाण्याच्या भाड्याचे पैसेही मागितले जातात. ग्राहक ांनी पैसे देण्यास नकार दिल्यास अथवा पैसे कमी दिल्यास पुन्हा दुरुस्तीसाठी येणार नसल्याचे एजन्सीचे कर्मचारी उत्तर देतात. त्यामुळे नाईलाजाने अधिकचे पैसे द्यावे लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Walujवाळूज