शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर भामट्यावर विश्वास बसला अन् १० लाख ५५ हजार गमावले; चार दिवस चालला एक टास्क 

By राम शिनगारे | Updated: October 12, 2022 22:11 IST

अशोकने सायबर भामट्यांनी पाठविलेल्या लिंकद्वारे यूपीआय आयडीवर तब्बल २८ वेळा पैसे पाठवले. त्यातील सुरुवातीच्या तीन वेळाच भरलेल्या पैशाला मोठ्या प्रमाणात परतावा मिळाला. त्याला भुलून उर्वरित पैसे गमावल्याचे स्पष्ट झाले.

 

औरंगाबाद: झटपट पैशांसाठी पार्टटाइम जॉबचा एक ‘टास्क’ युवकाच्या चांगलाच अंगलट आला आहे. व्हाॅट्सॲपवर आलेल्या लिंकवर माहिती भरल्यानंतर दिलेल्या टास्कवर विश्वास ठेवत स्वत:सह मित्रांच्या फोन पे वरून ‘युपीआय’ आयडीवर तब्बल १० लाख ५५ हजार ५३ रुपये पाठविले. हे सर्व पैसे सायबर भामट्यांनी हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अशोक (नाव बदलले आहे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शेंद्रा एमआयडीसीतील एका कंपनीत आहेत. त्यांना ४ ऑक्टोबर रोजी अनोळखी व्हाॅट्सॲप क्रमांकावरून पार्टटाइम जॉबसाठी मेसेज आला. मेसेजमध्ये १,८०० ते १० हजार कमवा असे लिहिले होते. अशोक यांनी संबंधित व्हाॅट्सॲपवर चर्चा केली. समोरील व्यक्तीने जॉबसाठी आमचा टास्क पूर्ण करावा लागेल, अशी माहिती दिली. त्यासाठी एक लिंकही पाठवली. त्या लिंकवर अशोकने सर्व माहिती भरली. त्यानंतर फोन पे द्वारे आरोपीने दिलेल्या युपीआय आयडीवर १०० रुपये भरले. तेव्हा अशोकच्या बँक खात्यात २२८ रुपये जमा झाले. पहिल्या ट्रान्झॅक्शननंतर अशोकच्या टेलिग्रामवर लिंक मिळाली. त्यातही अशोकने सर्व माहिती भरली. ५ ऑक्टोबर रोजी अशोकला टेलिग्रामवर संदेश आला. त्यात एक हजार रुपये भरून तुमचा टास्क पूर्ण करा, असे सांगितले. त्यानुसार त्याने एक हजार भरल्यावर त्याच्या बँक खात्यात एक हजार ४३६ रुपये जमा झाले. त्यानंतर त्याने पुन्हा तीन हजार रुपये भरले. तेव्हा चार हजार ३९९ रुपये जमा झाले. या दोन टास्कमुळे अशोकचा विश्वास बसला आणि त्यातच घात झाल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपास निरीक्षक संतोष घुगे करीत आहेत.   

चार दिवस चालला एक टास्क -अशोकचा टेलिग्रामवरील टास्कवर विश्वास बसल्यानंतर एक मोठा टास्क मिळाला. त्यानुसार अशोकने ५ ऑक्टोबर रोजी लिंकद्वारे मिळालेल्या ‘यूपीआय’ आयडीवर स्वत: व मित्रांमार्फत वेळोवेळी पैसे भरले. ८ ऑक्टोबर रोजी टेलिग्रामधारकाने टास्क पूर्ण झाला असल्याचा मेसेज दिला. त्यानुसार पैसे काढण्यासाठी तुमचा टास्क म्हणून दोन वेळा ९० हजार, ८५ हजार ५००, ३५ हजार, ७२ हजार, १०० आणि २०० रुपये प्राप्त यूपीआय आयडीवर पाठवले. जमा केलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता निघालीच नाही. एकूण १० लाख ५५ हजार ५३ रुपये चार दिवसांच्या टास्कमध्ये भरण्यात आले. ते काढण्यासाठी पुन्हा ९ लाखांचा टास्क दिला. मात्र, शंका आल्यामुळे अशोकने पैसे भरले नाहीत.

२८ वेळा पैसे पाठवले -अशोकने सायबर भामट्यांनी पाठविलेल्या लिंकद्वारे यूपीआय आयडीवर तब्बल २८ वेळा पैसे पाठवले. त्यातील सुरुवातीच्या तीन वेळाच भरलेल्या पैशाला मोठ्या प्रमाणात परतावा मिळाला. त्याला भुलून उर्वरित पैसे गमावल्याचे स्पष्ट झाले.

युवक प्रचंड घाबरला -अशोकला फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर तो प्रचंड घाबरला. जवळचे पैसेच गेल्यामुळे तो हादरला. ग्रामीण सायबर पोलिसांनी त्यास धीर देत शांत केले. तसेच पैसे परत मिळविण्यासाठी तत्काळ संबंधित गेट-वेशी संपर्क साधला. मात्र पैसे परत मिळतील की नाही, याविषयी पोलिसांनाही संशयच आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद