शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! अत्याचाराच्या प्रकरणात कोठडीतील आरोपीची टॉयलेटमध्ये ॲसिड पिऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 19:03 IST

पिशोर ठाण्याचे निरीक्षक आणि तक्रारदार मुलीच्या वडिलाला विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मयताच्या नातेवाईकांनी घेतल्याने घाटी रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देलघुशंकेसाठी टॉयलेटमध्ये नेल्यावर ॲसिड पिल्यानंतर घाटीत केले होते दाखल  आरोपीने एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते.

औरंगाबाद: सतरा वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पिशोर (ता. कन्नड)पोलिसांच्या कोठडीत असताना शुक्रवारी सकाळी स्वच्छतागृहात ॲसिड पिलेल्या आरोपीचा उपचारा दरम्यान शनिवारी सायंकाळी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. पिशोर ठाण्याचे निरीक्षक आणि तक्रारदार मुलीच्या वडिलाला विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मयताच्या नातेवाईकांनी घेतल्याने घाटी रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. भगवान हरदास महालकर (३८, रा.खांडी पिंपळगाव,ता.खुलताबाद ) असे मयताचे नाव आहे. 

या घटनेविषयी प्राप्त माहितीनुसार, भगवान वारकरी संप्रदायाचा होता. त्याने काही दिवसापूर्वी जैतखेडा येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पिशोर पोलिसांनी भगवान आणि पीडितेला शोधून काढले. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी भगवान विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून त्याला बुधवारी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी सकाळी भगवानच्या विनंतीवरुन पोलीस त्याला लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात घेऊन गेले. यावेळी भगवानने तेथील ॲसिड प्राशन केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भगवानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पिशोर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार भगवानने विष पिल्याचे पोलीस सांगत आहेत. असे असले तरी ठाण्यात विष आले कुठून असा संतप्त सवाल मयताचा भाऊ गोकुळ महालकरने केला. त्याला विष पाजून मारण्यात आले असावे असा संशय त्यांनी व्यक्त केला. भगवानच्या मृत्यूप्रकरणी सबंधित फौजदार आणि मुलीचे वडिल यांच्याविरूध्द जोपर्यंत खुनाचा गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्यासह नातेवाईकानी घेतली. घाटीतील शवविच्छेदन गृहासमोर नातेवाईक जमले होते.